रात्री सॉक्स घालून झोपल्याने मिळतात अनेक फायदे, पण एक चूक पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 10:56 AM2022-12-09T10:56:41+5:302022-12-09T10:57:12+5:30

Sleeping With Socks On : काही लोकांचं मत आहे की, याने शरीराचं तापमान जास्त वाढतं आणि झोपेत अडथळा निर्माण होण्याचा धोका असतो. पण मुळात सॉक्स शरीराच्या आतील तापमान रेगुलेट करण्याचं काम करतात.

Benefits and disadvantages of sleeping with socks on | रात्री सॉक्स घालून झोपल्याने मिळतात अनेक फायदे, पण एक चूक पडू शकते महागात

रात्री सॉक्स घालून झोपल्याने मिळतात अनेक फायदे, पण एक चूक पडू शकते महागात

googlenewsNext

Sleeping With Socks On : झोप आयुष्याचा महत्वाचा भाग असते. तुमच्या तुमच्या दिवसातून जवळपास एक तृतीयांश भाग झोपण्यात घालवता. मेंदू आणि शरीराच्या कार्यासाठी झोप फार महत्वाची असते. पण जास्तीत जास्त लोकांना वेळेवर झोपण्यात समस्या येते. ही समस्या दूर करण्यासाठी आहारात बदल, व्यायाम आणि मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही कधी सॉक्स घालून झोपले आहात का? जर असं केलं नसेल तर करून बघा.
तसे तर अनेक लोक हिवाळ्यात उष्णतेसाठी अनेक लोक सॉक्स घालून झोपतात. पण काही लोकांचं मत आहे की, याने शरीराचं तापमान जास्त वाढतं आणि झोपेत अडथळा निर्माण होण्याचा धोका असतो. पण मुळात सॉक्स शरीराच्या आतील तापमान रेगुलेट करण्याचं काम करतात.

NCBI मध्ये प्रकाशित एका स्टडीनुसार, जे वयस्क लोक सॉक्स घालून झोपतात त्यांना झोप न येण्याची समस्या होत नाही. सोबतच ते तुलनात्मक रूपाने लवकर झोपतात. सॉक्स घालून झोपण्याच्या अनेक फायद्यांबाबत आणि नुकसानाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं

क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, सॉक्स घालून झोपल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढतं. आणि जेव्हा यात सुधारणा होते तेव्हा शरीराला फायदा मिळतो. ज्यामुळे हृदय, फुप्फुसं आणि मांसपेशी मजबूत होतात.

झोप लवकर येते

सॉक्स घालून झोपणं डिस्टल वासोडिलेशनच्या प्रक्रियेसाठी फायदेशीर असतं. ही ती जागा आहे जिथे रक्तप्रवाह हात आणि पायांमध्ये वाढतो. सोबतच कोर तापमान कमी करतं आणि तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत मिळते.

मेनोपॉज हॉट फ्लॅशेसमध्ये आराम

रात्रीच्या वेळी मेनोपॉज हॉट फ्लॅशेस शरीराचं तापमान वाढवण्याचं काम करतं. अशात तुम्ही विचार करता की, सॉक्स घालून झोपल्याने तापमान आणखी वाढेल. पण होतं याच्या उलट. कारण गरम पाय ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा करतात. ज्याने शरीराचं तापमान स्थिर होतं आणि मेनोपॉज हॉट फ्लॅशेस कमी करण्यासही मदत मिळते.

टाचांच्या भेगा दूर होतात

जर तुम्हाला टाचांना भेगा असतील तर याचं कारण सतत थंड, शुष्क हवेच्या संपर्कात राहिल्याने होतं. ज्यामुळे तुमची त्वचा शुष्क होते. अशात ही समस्या दूर करण्यासाठी पायांना मॉइश्चराइज करून सॉक्स घाला. याने भेगा दूर होण्यास मदत मिळते. 

या चुका कराल तर मिळणार नाही फायदे

सॉक्स घालून झोपल्याने ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते.  जर तुम्ही घालत असलेले सॉक्स फार जास्त टाइट किंवा जाड असतील तर याने ब्लड फ्लोमध्ये कमतरता येऊ शकते. त्यासोबतच सॉक्स नियमितपणे धुण्याचीही गरज असते. रात्री सॉक्स घालणार असाल तर ते स्वच्छ असले पाहिजे. 

Web Title: Benefits and disadvantages of sleeping with socks on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.