खरंच दातांना तार लावणं फायद्याचं असतं का? कशी घ्याल काळजी...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 10:01 AM2020-03-23T10:01:04+5:302020-03-23T10:14:37+5:30
म्हणूनच दातांना तार लावण्याआधी काही गोष्टी समजावून घेणं गरजेचं आहे.
अनेकांचे दात लहानपणापासूनच वाकडे तिकडे असतात आपले दात चांगले म्हणजे योग्य ठिकाणी योग्य आकारात हवेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. आपल्यापैकी बरेचजण दात सरळ करण्यासाठी दातांना तार म्हणजेच ब्रेसेस लावतात. आज आम्ही तुम्हाला ब्रेसेस लावणं सुरक्षित असतं का याबाबत माहिती देणार आहोत. कारण दातांना तार लावण्याचे फायदे आहेत तसंच तोटे सुद्धा आहेत.
काही लोक डेंटिस्टच्या सल्लानुसार दातांना तार लावतात. काहीवेळा हे चुकीचं सुद्धा ठरू शकतं. त्यासाठी दात मजबूत असायला हवेत नाहीतर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी त्रास होऊ शकतो. म्हणूनच दातांना तार लावण्याआधी काही गोष्टी समजावून घेणं गरजेचं आहे.
दातांना आकार येतो
जर तुमचे दात वाकडे तिकडे असतील तर दातांना ब्रेसेस लावल्यामुळे अनेक फायदे मिळतात. याशिवाय अन्न चावण्याच्या क्षमतेमध्ये सुद्धा सुधारणा दिसून येते. दात खराब असल्यामुळे जर तुम्हाला बोलायला त्रास होत असेल तर ती समस्या सुद्धा दूर होते.
दातांना तार लावण्याचे नुकसान
दातांना तार लावणं सुरक्षित असतं. पण हे करण्यात जोखिम सुद्धा असते. दातांमध्ये ब्रेसेस लावल्यामुळे खाल्लेलं अन्न अडकण्याची शक्यता असते. जर अडकलेलं अन्न काढलं गेलं नाही तर दातांना डाग पडण्याची शक्यता असते. किंवा दातांना किड सुद्धा लागू शकते.
ब्रेसेस लावल्यामुळे दात आपल्या जागेवरून सरकून इतर जागी गेल्याने त्यामुळे हाडं गळून पडत असतात. तसंच मागच्या बाजूला वेगळी हाडं तयार व्हायला लागतात. त्यामुळे दात कमजोर होऊ शकतात.
दाताचं तारेपासून होणारं नुकसान टाळण्यासााठी काय कराल.
मीठ आणि स्टार्चयुक्त पदार्थांमुळे दातांमध्ये किड लागण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन कमी करा. ( हे पण वाचा- Corona virus : हळदीच्या दुधाचे सेवन करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा आणि आजारांचं टेंशन विसरा.....)
खाल्यानंतर ब्रश करूनु आपले दात साफ करा. सतत ब्रश करणं शक्य नसेल तर पाण्याच्या गुळण्या करा. चॉकलेट च्विंगम असे पदार्थ दातांना चिकटून राहण्याची शक्यता असते.
दातांना तार लावल्यानंतर तुम्ही जास्त कडक असलेले पदार्थ खाऊ शकत नाही. गाजर, मुळा, मका, ड्रायफ्रुट्स यांमुळे तार तुटू शकते. त्यामुळे दातांना तार लावल्यानंतर डेंटिस्टकडे सतत तपासणी करत रहा. ज्यामुळे तुमचे दात चांगले राहतील. ( हे पण वाचा- रोजच्या जगण्यात 'हे' बदल करून पाठीचं दुखणं कायमचं दूर ठेवा)