उन्हाळ्यात मसाज करणं आरोग्यासाठी फायदेशीर; 'हे' आहेत फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 07:12 PM2019-04-10T19:12:03+5:302019-04-10T19:18:15+5:30
उन्हाळा सुरू झाला असून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. या वातावरणामध्ये बाहेर पडल्यानंतर प्रखर ऊन आणि उकाडा प्रचंड हैराण करतो.
(Image Credit : Elements Massage)
उन्हाळा सुरू झाला असून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. या वातावरणामध्ये बाहेर पडल्यानंतर प्रखर ऊन आणि उकाडा प्रचंड हैराण करतो. याव्यतिरिक्त दररोजची धावपळ असलेला दिनक्रम यांमुळे प्रचंड थकवा येतो. कधीकधी तर याचं रूपांतर शरीराच्या समस्यांमध्येही होतं. अनेकदा अंगदुखीचाही त्रास सहन करावा लागतो. यामुळे कोणतंही काम करण्याची इच्छा उरत नाही. या सर्व समस्यांपासून सुटका करण्यासाठी मसाज मदत करतं. मसाज केल्याने शरीराला ताजंतवानं वाटतं तसेच आरामही मिळतो. एवढचं नाही तर मसाज केल्यानंतर तुम्हाला शांत आणि फ्रेश वाटतं. जाणून घेऊया मसाज केल्याने शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत...
मसाज करण्याचे फायेद :
1. मसाज केल्याने स्नायूंच्या वेदना दूर होतात. याव्यतिरिक्त मेटाबॉलिज्मची प्रक्रियाही सुरळीत होते. त्यामुळे शरीराला आराम देण्यासोबतच समस्यांपासून दूर राहण्यासाठी मसाज करणं फायदेशीर ठरतं.
2. मसाज केल्याने शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. त्यामुळे ब्लड प्रेशरची समस्येपासून दूर राहणं शक्य होतं.
3. मसाज केल्याने शांत झोप लागण्यास मदत होते. ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासोबतच डोळ्यांची दृष्टी वाढण्यासाठीही मदत होते. तसेच त्वचा चमकदार आणि तजेलदार होते.
4. मसाज केल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते. तसेच मसाज केल्याने शरीर सुदृढ होतं.
5. दररोज मसाज केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते.
6. मसाज केल्याने त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते आणि त्वचा चमकदार होते.
7. मसाज केल्याने डोकं शांत राहतं आणि मानसिक आरोग्य जपण्यासही मदत होते.
8. मसाज करताना जे तेल वापरण्यात येतं. ते स्किन पोर्समध्ये जातं त्यामुळे जीवाणू शरीरामध्ये जाण्याचा धोका टळतो.
बॉडी मसाज व्यतिरिक्त हे मसाजही करू शकता ट्राय :
- हेड मसाज
- गालांना मालिश
- बॅक मसाज
- नेक मसाज
- लेग मसाज
टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.