रोज पायऱ्या चढण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन झटपट कमी होतेच पण, 'हे' आजारा राहतात दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 04:50 PM2021-08-18T16:50:28+5:302021-08-18T16:53:39+5:30

पायऱ्या चढण्या-उतरण्यासारख्या साध्या कृतीनेही आपण वजन कमी करू शकता. हा व्यायाम नियमितपणे केल्यास वजन कमी करण्यासाठीचा उत्तम व्यायाम आहे.

benefits of climbing stairs, weight loss and much more | रोज पायऱ्या चढण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन झटपट कमी होतेच पण, 'हे' आजारा राहतात दूर

रोज पायऱ्या चढण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन झटपट कमी होतेच पण, 'हे' आजारा राहतात दूर

googlenewsNext

आपल्याला वाटते की वजन कमी करायचे असेल तर जिमलाच जावे लागते, त्याशिवाय आपले वजन कमी होणार नाही. पण असे नाही. पायऱ्या चढण्या-उतरण्यासारख्या साध्या कृतीनेही आपण वजन कमी करू शकता. हा व्यायाम नियमितपणे केल्यास वजन कमी करण्यासाठीचा उत्तम व्यायाम आहे. तुम्ही कामावरून घरी आल्यावर लिफ्टचा उपयोग करण्याऐवजी पायऱ्यांचा उपयोग करत चढत घरी या. यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल.

जिन्याच्या पायऱ्या चढल्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबधित आजारांपासून सुटका मिळू शकते. तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हा अत्यंत योग्य व्यायाम आहे. तणाव व अन्य चिंता दूर करण्यासाठीही हा व्यायाम अत्यंत फायदेशीर आहे. संधिवाताच्या (arthritis)च्या रुग्णांनी मात्र हा व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बॅलन्स आणि स्टॅमिना वाढतो
फिटनेस एक्सपर्टच्या मते पायऱ्या चढल्याने तुमच्या पायांची आणि टाचांचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे तुम्ही शरीराचा तोल व्यवस्थित सांभाळू शकता. यामुळे तुमच्या शरीरात संतुलन राहिलं आणि सहनशक्तीही वाढेल. सुुरुवातीला पायऱ्या चढताना तुम्हाला त्रास होईल पण हळूहळू सरावाने जमेल.

मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम
तज्ज्ञांच्या मदते पायऱ्या चढल्याने तुम्हाला मुड-बुस्टिंग एनर्जी मिळेते. यामुळे कॅलरी बर्न होतात व शरीरात रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. यामुळे मानसिक ताणतणावही दूर राहतात.

उत्तम व्यायाम
स्नायु बळकट करण्याव्यतिरिक्त क्वाड्रिसेप्स, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग आदीही उत्तम बनवण्यासाठी अशाप्रकारच्या व्यायामाचा फायदा होतो. पायऱ्या चढल्याने, चालण्याने व जॉगिंग केल्याने आपले स्नायू अधिक मजबूत होतात.

वजन कमी होते
तुमचे वजन कमी करण्यासाठी हा उत्तम व्यायाम आहे. तुम्ही जिन्याच्या पायऱ्या चढण्याची सवय लावून घेतली तर तुमचे वजन हळूहळू कमी होईल. यासाठी तुम्ही कार्डिओ करत आहात अशा पद्धतीने पायऱ्या चढा. मात्र ध्यानात ठेवा एकाच वेळी भरपूर पायऱ्या चढू नका. याची हळू हळू सवय लावा जेणेकरून तुम्ही कमी थकाल.

 

Web Title: benefits of climbing stairs, weight loss and much more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.