नारळाचे तेल इतके बहुगुणी की केसांबरोबरच त्वचेसाठीही वरदान, त्वचेच्या समस्या चुटकीसरशी गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 11:55 AM2021-10-27T11:55:04+5:302021-10-27T12:00:28+5:30

गेल्या काही काळात त्वचेसाठी नारळाचा बेस असलेल्या तेलाकडे नव्याने कल वाढला असून त्यामागे त्वचेचा पृष्ठभाग सुधारणे तसेच त्वचेचे दोष दूर करण्याचा हेतू आहे. नारळाचा बेस असलेले केस व त्वचेसाठीचे तेल केसांचे ग्रुमिंगपूर्व कंडिशनिंग करते. व्हिटॅमिन ईसारखे यातील विविध घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी फारच उपयुक्त आहेत.

benefits of coconut oil, coconut oil is best for your skin says expert | नारळाचे तेल इतके बहुगुणी की केसांबरोबरच त्वचेसाठीही वरदान, त्वचेच्या समस्या चुटकीसरशी गायब

नारळाचे तेल इतके बहुगुणी की केसांबरोबरच त्वचेसाठीही वरदान, त्वचेच्या समस्या चुटकीसरशी गायब

googlenewsNext

त्वचा आणि केसांची काळजी घेताना कोणतेच उत्पादन बहुगुणी नारळाचा वापर केलेल्या उत्पादनांशी फारशी स्पर्धा करू शकत नाही. नारळाचा बेस असलेले केस व त्वचेसाठीचे तेल केसांचे ग्रुमिंगपूर्व कंडिशनिंग करते. व्हिटॅमिन ईसारखे यातील विविध घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी फारच उपयुक्त आहेत.

ज्ञात काळापासूनच वनस्पतीपासून काढलेले तेल त्वचेच्या काळजीसाठी वापरले जाते. गेल्या काही काळात त्वचेसाठी नारळाचा बेस असलेल्या तेलाकडे नव्याने कल वाढला असून त्यामागे त्वचेचा पृष्ठभाग सुधारणे तसेच त्वचेचे दोष दूर करण्याचा हेतू आहे.

नारळाचा बेस असलेले तेल सक्षम मॉइश्चरायझर असून विविध अभ्यासाअंती असे तेल त्वचा मऊ करण्यासाठी खनिज तेलाइतके किंबहुना काही बाबतीत त्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. नारळाचा बेस असलेल्या तेलाचा त्वचेसाठी नियमित वापर केल्यामुळे त्वचेतील आर्द्रता वाढते आणि त्वचेमधील बॅरियर लिपिड्स अधिक मजबूत होतात.

नारळाचे तेल सुक्ष्म कणांमुळे त्वचेत सहज शोषले जाते आणि त्वचेत अगदी खोलवर जाऊन त्वचेला मॉइश्चराइज करते. त्वचेतील पाण्याची पातळी कमी होण्याचे प्रमाणही यामुळे मंदावते आणि त्यामुळे नारळयुक्त तेलामुळे त्वचा अधिक काळ मॉइश्चराइज राहते.

निसर्गातील प्रदूषण, कोविडमुळे अती स्वच्छता आणि वातावरणातील बदल यांमुळे आपल्या सर्वांच्याच त्वचेचा बाह्य पृष्ठभाग कोरडा होत आहे. नारळाचा बेस असलेले तेल हे सर्व दुष्परिणाम हाताळण्यासाठीचा सोपा, सहज उपलब्ध होणारा आणि किफायतशीर पर्याय आहे.

विशेष म्हणजे, नारळाचा बेस असलेले तेल त्वचेत चांगल्या प्रकारे शोषले जाते व मोनोलॉरिन आणि लॉरिक असिड या अँटीमायक्रोबल एजंट्समध्ये प्रवेश करते. हे एजंट्स जन्माच्या वेळेस कमी वजन असलेल्या बाळांमधील स्किन बॅरियरचे कामकाज सुधारते. स्किन बॅरियरचे कामकाज सुधारल्यामुळे थर्मो रेग्युलेशन सुधारते व वजनातही सुधारणा होते. म्हणून नारळाचा बेस असलेल्या तेलाने नियमित मसाज केल्यास प्रीमॅच्युअर बाळांना संसर्गाशी लढण्यास मदत होते व ती सुरक्षित राहातात.

संसर्ग-प्रतिबंधक एजंट म्हणून ओळखले जाणारे नारळाचा बेस असलेले त्वचेसाठीचे तेल अतिशय कोरडी त्वचा असलेल्या लोकांमधील जिवाणूंचे प्रमाण कमी करून खाज व पुरळ बरे करण्यास मदत करते. नारळाचा बेस असलेले त्वचेसाठीचे तेल वाजवी किमतीत आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे अशा प्रकारची त्वचा निरोगी, आर्द्र व मुलायम राहाते. सेल्युलर अभ्यासानुसार नारळाचा बेस असलेले त्वचेसाठीचे तेल विषाणू- जिवाणू प्रतिबंधक तसेच बुरशीरोधकही असते.

त्वचेसाठीच्या नारळाचा बेस असलेल्या तेलाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते अतिशय सुरक्षित, त्वचेला इरिटेड न करणारे, बिनविषारी आणि नॉन-सेन्सिटायझिंग असते.

दुहेरी क्लिन्झिंगची पद्धत ट्रेंडमध्ये असल्यामुळे त्वचेसाठीचे नारळाचा बेस असलेले तेल चेहऱ्यावर नेहमीचे क्लिन्झर लावण्यापूर्वी मेक-अप किंवा सनस्क्रीन काढण्यासाठीची पहिली पायरी म्हणून यशस्वीपणे वापरले जात आहे. ते विशेषतः डोळ्यांसाठी सुरक्षित असल्यामुळे डोळ्यांचा मेकअप काढताना इजा होत नाही, डोळ्याभोवतीची नाजूक त्वचा आर्द्र राहाते व मेक-अप रिमूव्हर्सप्रमाणे त्वचेतील तेल शोषले जात नाही.

मुरमं असलेल्या त्वचेसाठी नारळाचा बेस असलेले तेल काळजीपूर्व वापरावे लागते, कारण त्यात कॉमेडोजेनिक घटक असतात. नारळाचा बेस असलेले त्वचेसाठीचे तेल बॉडी मॉइश्चरायझर, लिप बामसाठी तसेच नखांभोवतीचे क्युटिकल्स नरम ठेवण्यासाठी सोपा पर्याय आहे.

सारांश सांगायचा तर, नारळाचा बेस असलेले त्वचेसाठीचे तेल स्किन बॅरियर सुधारण्यासाठी आवश्यक गुणधर्मांनी युक्त, वाजवी, सुरक्षित आणि शरीरावरील त्वचेसाठी प्रभावी मॉइश्चरायझर आहे.

-डॉ. जुश्या भाटिया सरिन

Web Title: benefits of coconut oil, coconut oil is best for your skin says expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.