अनेक गंभीर आजारांवर रामबाण, तुम्हाला माहितही नसतील इतके आहेत जिऱ्याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:18 PM2021-08-12T12:18:34+5:302021-08-12T12:27:30+5:30

जिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा आहे, ज्यामुळे आपल्या आरोग्यास उपयुक्त पोषक घटकांचा पुरवठा होतो. महत्त्वाचे म्हणजे वजन घटवण्यासाठी जिरे अतिशय प्रभावी उपाय आहे.

benefits of cumin seeds, obesity stomach pain and pimple relief | अनेक गंभीर आजारांवर रामबाण, तुम्हाला माहितही नसतील इतके आहेत जिऱ्याचे फायदे!

अनेक गंभीर आजारांवर रामबाण, तुम्हाला माहितही नसतील इतके आहेत जिऱ्याचे फायदे!

googlenewsNext

प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरामध्ये सहजरित्या आढळणारी सामग्री म्हणजे जिरे. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी या गरम मसाल्याचा आवर्जून उपयोग केला जातोच. जिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा आहे, ज्यामुळे आपल्या आरोग्यास उपयुक्त पोषक घटकांचा पुरवठा होतो. महत्त्वाचे म्हणजे वजन घटवण्यासाठी जिरे अतिशय प्रभावी उपाय आहे. डॉ. मनीष सिंह यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला जिऱ्याचे फायदे सांगितले आहे.

वजन घटवण्यास मदत करते
शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी उपयुक्त असलेल्या घटकांचा जिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आयुर्वेदानुसार आहारामध्ये जिऱ्याचा नियमित समावेश करणं लाभदायक असते. यातील औषधी घटकांमुळे पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहते, ज्यामुळे वजन सहजरित्या कमी होते. नियमित जिऱ्याचे सेवन केल्यास वाढत्या वजनाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.आहारामध्ये जिऱ्याचा समावेश करण्याव्यतिरिक्त बहुतांश जण नियमित स्वरुपात जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. जिरे पाण्यात भिजवल्यास ऑस्मोसिस नावाची एक नैसर्गिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेमध्ये जिऱ्यातील सर्व पोषक घटक पाण्यामध्ये मिक्स होतात. ज्यामुळे पाण्याला फिकट पिवळा रंग येतो. जिऱ्याचे हे पाणी प्यायल्यास वजन वाढत नाही.

पोटाच्या समस्यांवर आराम
जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सीडंट पचनक्षमता वाढवतात. जिरं आपल्या प्रतिकारशक्तीलाही वाढवतं. त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. जिऱ्याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगलं पचत. आवळ्यासोबत जिरं, ओवा आणि काळं मीठ मिसळून खाल्ल्यास भूक वाढते.

मुरुमं अन् त्वचेच्या समस्या दूर होतात
जिरं हे ब्यूटी बूस्टर म्हणून ओळखलं जातं. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स आढळतात. जे त्वचेच्या व्हिटॅमीन ई च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही जिऱ्याचं पाणी रोज घेतल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं आमि चेहऱ्यावरील अॅक्नेची समस्या दूर होईल. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शन (Skin Infections) पासूनही रक्षण होतं.

सर्दीच्या समस्येपासून मुक्तता
थंडीच्या दिवसात नाक बंद होण्याची समस्या खूप कॉमन आहे. पण काहीजणांना हा त्रास बरेच दिवस होतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून घ्या आणि त्याची एक पोटली बनवून घ्या. मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने शिंका येणं बंद होईल. तसंच जिरं हे बद्धकोष्ठ दूर करण्यात ही मदत करतं. बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी एक ग्लास ताकात काळ मीठं आणि भाजलेलं जिरं घालून प्या. असं केल्याने लवकर बरं वाटेल. 

अशक्तपणा कमी होतो
पामुळे जेव्हा शरीर दूखू लागतं. तेव्हाच आपल्याला अशक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी जिऱ्यासोबत गूळ मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा खा. ताप कमी होईल. तसंच तुम्ही ताप आल्यावर जिऱ्याचं पाणी ही घेऊ शकता. जिऱ्यातील थंडावा अंगातील उष्णतेला त्वरित कमी करतो आणि ताप उतरतो.

Web Title: benefits of cumin seeds, obesity stomach pain and pimple relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.