हिमालयन सॉल्टच्या 'या' खास ड्रिंकची होतेय चर्चा, फायदे वाचाल तर लगेच सेवन कराल! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 10:59 AM2019-12-14T10:59:06+5:302019-12-14T11:00:58+5:30

सकाळी अनेकजण चहा, कॉफी, ज्यूस, लिंबूपाणी आणि दुधाचं सेवन करतात. यातील काही पेय स्वादिष्ट असतात तर काहींचे आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळतात.

Benefits of drinking himalayan salt water in the morning | हिमालयन सॉल्टच्या 'या' खास ड्रिंकची होतेय चर्चा, फायदे वाचाल तर लगेच सेवन कराल! 

हिमालयन सॉल्टच्या 'या' खास ड्रिंकची होतेय चर्चा, फायदे वाचाल तर लगेच सेवन कराल! 

googlenewsNext

सकाळी अनेकजण चहा, कॉफी, ज्यूस, लिंबूपाणी आणि दुधाचं सेवन करतात. यातील काही पेय स्वादिष्ट असतात तर काहींचे आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळतात. अशात काही महिन्यांपासून हेल्थ इंडस्ट्रीमध्ये एका पेयाची फारच चर्चा रंगली आहे. हे पेय टेस्टमुळे नाही तर याच्या आरोग्याला होणाऱ्या फायद्यामुळे चर्चेत आहे. हे पेय म्हणजे हिमालयन सॉल्ट जे पाकिस्तानच्या हिमालया परिसरात आढळतं.

प्रसिद्ध आहे हे पेय

(Image Credit : theshadow.in)

हिमालयन सॉल्टबाबत सांगायचं तर हे एकप्रकारचं मीठ आहे जे मिनरल कॉन्टेंट, प्रोसेसिंगची पद्धत आणि हेल्थ बेनिफिट्सच्या बाबतीत सर्वच मिठांपेक्षा चांगलं आहे. याचे आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

पचनक्रिया सुधारते

हिमालयन सॉल्ट पचनक्रिया सुधारण्यास मदत करणाऱ्या एंजाइम्सला स्टिम्युलेट करतं. सोबतच हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढवतं. याने अन्न पचण्यास मदत मिळते. हिमालयन सॉल्ट खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतं.

मसल्स मजबूत होतात आणि डोकेदुखी थांबते

(Image Credit : medscape.com)

वेदना आणि क्रॅम्प्स इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडल्याने होते. सोडिअम व्यतिरिक्त हिमालयन सॉल्टमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स असतात. या सर्वांचा आरोग्याला फायदा होतो. मॅग्नेशिअम अ‍ॅंटी-इनफ्लेमेटरी आहे ज्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.

पेशींना हायड्रेट ठेवतं

आपण जेवढं पाणी पितो त्या पूर्ण पाण्याचा शरीर उपयोग करू शकत नाही. त्यामुळे शरीरात अतिरिक्त पाणी जमा होतं. याने ब्लडचं सोडिअम डायल्यूट होतं आणि सोडिअमचं प्रमाण कमी होऊ लागतं. हिमालयन सॉल्सने शरीरात पाणी जमा होत नाही आणि पाण्याचा योग्य वापर होतो. याने शरीरातील पेशींना पोषण मिळतं.

एनर्जी वाढते

(Image Credit : consciouslifenews.com)

हिमालयन सॉल्टमध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी वाढवणारे मिनरल्स असतात. पाण्यासोबत हिमालयन सॉल्टचं सेवन केल्यास मिनरल्स वेगाने अब्जॉर्ब होतात. याने तुम्हाला एनर्जी मिळते.

चांगली झोप

(Image Credit : independent.co.uk)

रिसर्चमधून समोर आलं आहे की, हिमालयन सॉल्ट स्ट्रेस हार्मोन ऐड्रेनलिन आणि कार्टिसोल कमी करतं. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते. हिमालयन सॉल्टमध्ये भरपूर मॅग्नेशिअम असतं ज्याने तणाव आणि स्ट्रेस कमी होतो.

अ‍ॅंटी मायक्रॉबिअल प्रॉपर्टी

हिमालयन सॉल्टमध्ये नॅच्युरल अ‍ॅंटी-मायक्रॉबिअल प्रॉपर्टीज असते. घसा खराब झाल्यावर  या मिठाच्या पाण्याने गुरळा केल्यास आराम मिळतो.

वजन कमी करण्यास मदत

हिमालयन सॉल्टने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. यात आढळणाऱ्या मिनरल्सने तुमची भूक कमी होते. सोबतच शरीरातून विषारी पदार्थही बाहेर काढले जातात. याने टेम्पररी वेट लॉससाठी मदत मिळते.


Web Title: Benefits of drinking himalayan salt water in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.