सर्दी, खोकलाच नाही; तर विषाणूंच्या संसर्गापासूनही लांब राहाल, जर १ ग्लास हळदीचे पाणी प्याल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:23 PM2020-06-02T18:23:13+5:302020-06-02T18:28:50+5:30

हळदीच्या पाण्याचे रोज सेवन केल्यानंतर तुम्ही आजारांपासून लांब राहू शकता.

Benefits of drinking turmeric water to health myb | सर्दी, खोकलाच नाही; तर विषाणूंच्या संसर्गापासूनही लांब राहाल, जर १ ग्लास हळदीचे पाणी प्याल

सर्दी, खोकलाच नाही; तर विषाणूंच्या संसर्गापासूनही लांब राहाल, जर १ ग्लास हळदीचे पाणी प्याल

googlenewsNext

आरोग्याच्या दृष्टीने असलेले हळदीचे फायदे तुम्हाला माहित असतीलच. हळद स्वयंपाकघरात हमखास वापरली जाते.  कोरोनाच्या माहामारीचा सामना करत असताना आता पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण कोरोनाचा संसर्ग होईल म्हणून सगळ्यांनाच आजारी पडायची भीती वाटते.  आज आम्ही तुम्हाला सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. हळदीच्या पाण्याचे रोज सेवन केल्यानंतर तुम्ही सगळ्या आजारांपासून लांब राहू शकता. चला तर मग जाणून घेऊया हळदीच्या पाण्याचे फायदे.

शरीरातील सूज कमी होते.

हळदीतील करक्युमिन नावाच्या रसायनामुळे शरीराची सूज कमी करण्यास मदत होते. शरीरावर कितीही सूज असली, तरी हळदीचे पाणी प्यायल्यास ती कमी होते. त्याशिवाय करक्युमिनमुळे सांधेदुखी दूर करण्यासाठी मदत होते.

हृदय चांगले राहते

हळदीच्या सेवनाने हृदय चांगले राहते. हळदीच्या पाण्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत. रक्त साफ होण्यासही मदत होते आहे. त्याशिवाय रक्ताच्या धमन्यांमध्येही रक्त साठत नाही. हळदीचे पाणीदेखील हृदय निरोगी राखण्याचे काम करते. हळदीच्या पाण्याच्या सेवनाने शरीरातील रक्त पुरवठा चांगला राहतो. 

पचनक्रिया व्यवस्थित राहते

सध्या लॉकडाऊनमुळे शरीराची पुरेशी हालचाल होत नाही. त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. तुम्हालाही अशी समस्या उद्भवते असेल तर हळदीच्या पाण्यामुळे जेवणाचे पचन चांगल्या प्रकारे होते. तसंच  पोटाविषयीच्या आजारांपासून संरक्षण होते. पचनक्रिया उत्तम राहावी यासाठी दररोज हळदीच्या पाण्याचे सेवन करावे.

सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवत नाही

 

हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते. म्हणून कोरोनासोबत जगत असताना तुम्हाला आजापासून लांब राहायचं असेल तर नेहमी सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात हळद मिसळून या पाण्याचे सेवन करा.

भयंकर! आठवड्याभरातच मृत्यूला बळी पडत आहेत; 'ही' समस्या असलेले कोरोना रुग्ण,तज्ज्ञांचा दावा

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे संकेत देतात ही लक्षणे, कोरोनापासून वाचण्यासाठी घ्या खबरदारी

Web Title: Benefits of drinking turmeric water to health myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.