दररोज सकाळी ब्रश करण्यापुर्वी एक ग्लास पाणी अवश्य प्या, फायदे इतके की सवयच लावून घ्याल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 06:00 PM2021-12-12T18:00:32+5:302021-12-12T18:04:45+5:30

निरोगी शरीरासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं समजल जातं. जर तुम्ही सकाळी उठून दात घासण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायलं तर तुमच्या शरीराला अनेक फायदे (Health Benefits) होतात, असं आयुर्वेद आणि नॅचरल थेरेपींमध्ये (natural therapy) सांगण्यात आलं आहे.

benefits of Drinking Water Before Brushing Teeth | दररोज सकाळी ब्रश करण्यापुर्वी एक ग्लास पाणी अवश्य प्या, फायदे इतके की सवयच लावून घ्याल

दररोज सकाळी ब्रश करण्यापुर्वी एक ग्लास पाणी अवश्य प्या, फायदे इतके की सवयच लावून घ्याल

googlenewsNext

आपल्या शरीरासाठी पाणी (Water) अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शरीराच्या एकूण वजनामध्ये ६० ते ७० टक्के वाटा पाण्याचा असतो. पाण्यामुळं शरीरातील अनेक अवयवांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते. म्हणूनच निरोगी शरीरासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं समजल जातं. जर तुम्ही सकाळी उठून दात घासण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायलं तर तुमच्या शरीराला अनेक फायदे (Health Benefits) होतात, असं आयुर्वेद आणि नॅचरल थेरेपींमध्ये (natural therapy) सांगण्यात आलं आहे.

ओन्ली माय हेल्थनुसार (OnlyMyHealth), आपल्या तोंडात असलेली लाळ जर सकाळी पाण्यासोबत पोटात गेली तर ती हानिकारक बॅक्टेरिया मारण्याचं काम करते. आज आम्ही तुम्हाला दात न घासता पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहेत.

1. बॉडी होईल डिटॉक्‍स
अनेकांना बॉडी डिटॉक्स (Detox) करणं खूप कठीण काम वाटतं. मात्र, नॅचरल थेरपीनुसार, जर तुम्ही सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायले तर शरीरातील अनेक विषारी पदार्थ सहज बाहेर काढले जाऊ शकतात. दररोज सकाळी कोमट पाणी (Warm water) प्यायलं तर आपल्या तोंडातील लाळ एक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. ही गोष्ट शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरते.

2. किडनी राहील निरोगी
आपली किडनी (kidney) निरोगी असणं खूप महत्वाचं आहे. सकाळी दात न घासता पाणी प्यायल्यानं किडनीशी संबंधित असलेल्या किडनी स्टोनसारख्या अनेक समस्या दूर होतात.

3. स्कीनसाठी उपयुक्त
सकाळी दात घासण्यापूर्वी पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे मुरुमांची (Pimples) समस्या दूर होते. यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते. परिणामी आपली त्वचा (Skin) हेल्दी आणि नितळ राहते.

4. मेटॅबॉलिजम रेट वाढतो
जे लोक दररोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर लगेच पाणी पितात त्यांचा मेटॅबॉलिजम (metabolism) रेट फार चांगला असतो. यामुळं वजन वाढत नाही आणि आरोग्यही चांगलं राहतं.

4. केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यानं केसांच्या मुळांतील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि केस मजबूत होण्यास मदत होते. ब्लड सर्क्युलेशन चांगलं असल्यास केसांची वाढदेखील (Hair Growth)चांगली होते.

5. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
सकाळी दात न घासता पाणी प्यायल्यास वजन कमी (Weight loss) करण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. सकाळी-सकाळी पाणी प्यायल्यानं मेटॅबॉलिजम रेट वाढतो आणि कॅलरीज् देखील बर्न होतात. त्यामुळं वजन नियंत्रित करण्याची इच्छा असेल तर सकाळी पाणी प्यावं.

सकाळी उठल्यानंतर दात न घासता फक्त एक ग्लास पाणी प्यायल्यास अनेक फायदे होतात. त्यामुळे ही सोपी सवय लावून घेण्यास हरकत नाही.

Web Title: benefits of Drinking Water Before Brushing Teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.