हिवाळ्यात आजारांना ४ हात लांब ठेवण्यासाठी फायदेशीर गाजराचा हलवा; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 05:32 PM2021-01-19T17:32:40+5:302021-01-19T17:52:02+5:30

Benefits of carrot in Marathi : गाजराचा वापर पुलाव, भाज्या, सॅलेड आणि सूप तयार करण्यासाठी केला जातो.

Benefits of eating carrot in winter | हिवाळ्यात आजारांना ४ हात लांब ठेवण्यासाठी फायदेशीर गाजराचा हलवा; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

हिवाळ्यात आजारांना ४ हात लांब ठेवण्यासाठी फायदेशीर गाजराचा हलवा; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

हिवाळ्याच्या वातावरणात ताज्या भाज्यांबरोबरच  लाल लाल गाजरंसुद्धा बाजारात दिसायला सरूवात होते. गाजराचा वापर पुलाव, भाज्या, सॅलेड आणि सूप तयार करण्यासाठी केला जातो. थंडीच्या वातावरणात गाजराचा हलवा खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात.  कारण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फ्रुट्स, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो.

गाजरात अनेक पोषक तत्व असतात. आज आम्ही तुम्हाला  गाजराच्या सेवाने शरीराला होणारे फायदे सांगणार आहोत. थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. 

कॅन्सरपासून बचाव

गाजरामध्ये कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याचेही गुण आहे. यातील कॅरोटिनाईड नावाचे तत्त्व असते जे प्रोस्टेट, कोलोन आणि स्तन कॅन्सरशी लढण्यासाठी सक्षम आहे. गाजर खाल्ल्याने आतडीचा कॅन्सर कमी होण्याचे प्रमाण सुमारे २४ टक्क्यांपर्यंत कमी होते. 

हृदयरोगींसाठी फायदेशीर

गाजरामधील कॅरोटिनॉईड तत्त्व हृदयरोगींसाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे गाजराच्या रोजच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.   

त्वचेसाठी फायदेशीर 

रोजच गाजराचे सॅलेड खाल्ल्याने किंवा गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर चकाकी येते. गाजराच्या सेवनाने रक्तातील विषाची मात्रा कमी होते. त्यामुळे मुरूमे-पुटकुळ्या इत्यादींपासून सुटका मिळते. 

डोळ्यांचे आरोग्य

गाजरमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ भरपूर प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते. शिवाय यातील बीटा-केरोटिन आणि पोटॅशियमदेखील असल्याने शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा

गाजराचे अन्य फायदे

गाजरच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ‘के’ असते, ज्यामुळे रक्त गोठण्यास मदत होते आणि रक्तस्त्राव थांबतो.  गाजरमधील विटॅमिन ‘सी’ मुळे जखम ठीक होण्यास मदत होते शिवाय हिरड्यादेखील स्वस्थ राहतात. गाजरमधील बीटा कॅरोटीनमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब  

(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहीती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. )

Web Title: Benefits of eating carrot in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.