खा या पाच प्रकारच्या खिचडी, अन् घटवा वजन झटपट! अन्य गंभीर आजारांवर रामबाणही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 12:06 PM2021-08-15T12:06:05+5:302021-08-15T12:11:10+5:30

तुम्हाला हे माहिती आहे का, की खिचडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आहारात खिचडीचा समावेश केला आहे.

benefits of eating khichdi, five types of khichdi to loose your weight, best for weightloss | खा या पाच प्रकारच्या खिचडी, अन् घटवा वजन झटपट! अन्य गंभीर आजारांवर रामबाणही...

खा या पाच प्रकारच्या खिचडी, अन् घटवा वजन झटपट! अन्य गंभीर आजारांवर रामबाणही...

googlenewsNext

खिचडी (Khichadi) ही एक सोपी रेसिपी आहे. जी आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पण, तुम्हाला हे माहिती आहे का, की खिचडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आहारात खिचडीचा समावेश केला आहे.

डाळ खिचडी : डाळ खिचडी हा अतिशय आरोग्यदायी आहार आहे. खिचडी बनवण्यासाठी तुम्ही मूग डाळ, तूर आणि चणा डाळ वापरू शकता. डाळींमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात. यामुळे तुमची भूक बराच काळ नियंत्रणात राहते. डाळ खिचडी मधुमेह आणि हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. खिचडीमध्ये प्रथिने आणि फायबर असतात. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, आठवड्यातून दोन दिवस खिचडी खाल्ल्याने जलद वजन कमी होण्यास मदत होते. अनेक सेलेब्स आपल्या आहारात खिचडीचा समावेश करतात.

दलिया खिचडी : दलिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. दलिया आपल्या कॅलरीचे सेवन नियंत्रित करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतो. यात व्हिटामिन बी-6, तांबे, मॅग्नेशियम, लोह यासह अनेक पोषक घटक असतात आणि कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते.

ओट्स खिचडी- जर तुम्हाला ओट्स खायला आवडत असतील, तर तुम्हाला ओट्स खिचडी देखील आवडेल. ही खिचडी मॅंगनीज, प्रथिने, फायबर, लोह समृध्द आहे. फायबर पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही.

कॉर्न खिचडी : मका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही. डोळे आणि हृदयासाठी मक्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. आपल्याला आवडत असल्यास, आपण त्यात गाजर, मटार आणि बीन्स घालू शकता.

बाजरीची खिचडी : ही खिचडी राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध आहे. बाजरीमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम अशा विविध पोषक घटक असतात. त्यात कॅलरीज कमी असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. एक वाटी खिचडी खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक देखील लागत नाही. दररोज बाजरीचे सेवन केल्याने टाइप-२ मधुमेह, अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोकाही कमी होऊ शकतो.

 

Web Title: benefits of eating khichdi, five types of khichdi to loose your weight, best for weightloss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.