फ्रॉग जम्पिंग एक्सरसाइज कराल तर जीमला जाणं विसराल, एक्सरसाइज एक फायदे अनेक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 11:54 AM2020-01-09T11:54:34+5:302020-01-09T12:48:26+5:30

स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत असतो.

Benefits of frog jump exercise for lower body and heart | फ्रॉग जम्पिंग एक्सरसाइज कराल तर जीमला जाणं विसराल, एक्सरसाइज एक फायदे अनेक!

फ्रॉग जम्पिंग एक्सरसाइज कराल तर जीमला जाणं विसराल, एक्सरसाइज एक फायदे अनेक!

googlenewsNext

स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत असतो.  नेहमी घाईगडबडीत असल्यामुळे  आपल्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. डाएट करण्याचा विचार जरी केला तरी घरात आणि ऑफिसमध्ये सगळ्यांबरोबर जेवत असताना  आपला  स्वतःच्या जीभेवर ताबा राहत नाही.  मग वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय करावे हे कळतं नाही.  खरं पाहता जीमला जाण्यासाठी वेळ फारसा कोणालाही नसतो. कारण घरातल्या आणि ऑफिसच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढणं सगळ्यात महिलांना शक्य होत नाही.  पण तुम्हाला माहितच असेल की जर तुम्ही जीमला जाऊन वजन कमी  केलं.  आणि त्यानंतर पुन्हा जीमला जाणं बंद केलं तर तुमचं वजन आधीपेक्षा अधिक वेगाने वाढू शकतं. 

तुम्ही जरी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवत असाल तरी वजन थो़ड्याफार फरकाने वाढतं, त्यात फॅट्स जास्त वाढतं जातात.  म्हणजेच तुमच्या शरीरावरची अतिरीक्त चरबी जास्त दिसायला लागते.  हातांच्या खालच्या भागातील चरबी, पोटाचा घेर, कंबर हे  भाग वाढतं असतात. तुम्हाला जर ही परिस्थिती टाळायची असेल आणि वजन कमी करायचं असेल तर तुम्ही  घरच्याघरी व्यायाम करून आपलं वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणता व्यायाम केल्याने  तुमच्या शरीरावरची चरबी दूर होईल.

फ्रॉग जम्पिंग एक्सरसाइज कशी कराल 

फ्रॉग जम्प एक्सरसाइज एका प्रकारंच  प्लायोमेट्रिक एक्सरसाइज आहे. जे शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स बर्न करण्यासाठी फायदेशीर ठरतं असतं. फ्रॉग जम्पिंग एक्सरसाइजमध्ये तुम्हाला पायांना हलकं गुडघ्यात वाकून बेडकासारख्या उड्या मारायच्या आहेत. या व्यायाम प्रकारासाठी तुम्हाला कोणत्याही मशिनची आवश्यकता भासणार नाही. हा व्यायाम तुम्ही घरच्याघरी सुध्दा करू शकता. या प्रकारातील वर्कआऊट खुपच सोपा आहे. त्यामुळे तुमच्या सर्व शरीराला व्यायाम मिळेल. थोड्या उड्या माराव्या. उडी मारताना पायांना थोडे आजूबाजूला करावे. सुमारे दोन मिनिटांपर्यंत हा व्यायाम करावा.

फ्रॉग जम्पिंग एक्सरसाइजचे फायदे

हा व्यायाम प्रकार वजन कमी होण्यासाठी फायदेशीर ठरतो

तुमच्या हातांचे मनगट आणि पायांना बळकटी देण्यासाठी उत्तम. 

हा व्यायामाचा प्रकार  तुमच्या हद्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो

स्टॅमिना वाढून शरीररात रक्तप्रवाह व्यवस्थित होतो.  

पायांच्या मासपेशी मजबूत होतात. 

Web Title: Benefits of frog jump exercise for lower body and heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.