पाटा वरवंट्याने मसाला वाटण्याचे फायदे वाचाल तर मिक्सरचा वापर विसरून जाल.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 11:37 AM2019-12-31T11:37:25+5:302019-12-31T11:41:40+5:30

सध्याच्या काळात सगळ्याच स्वयंपाक घराच आपल्याला पदार्थ दळण्यासाठी किंवा बारिक करण्यासाठी मिक्सरचा वापर केलेला दिसून येतो.

benefits of grind chutneys in traditional way | पाटा वरवंट्याने मसाला वाटण्याचे फायदे वाचाल तर मिक्सरचा वापर विसरून जाल.....

पाटा वरवंट्याने मसाला वाटण्याचे फायदे वाचाल तर मिक्सरचा वापर विसरून जाल.....

Next

सध्याच्या काळात सगळ्याच स्वयंपाकघरात आपल्याला पदार्थ दळण्यासाठी किंवा बारिक करण्यासाठी मिक्सरचा वापर केलेला दिसून येतो. तसंच तंत्रज्ञानामुळे सगळ्या कामात सुलभता आणि सोपेपणा आला असला तरी काही पारंपारिक पध्दती आजही शहरातील तसंच उपनगरातील घरांमध्ये वापरल्या जातात. किचनमध्ये  सध्याच्या काळात मिक्सरचा वापर पदार्थ बारिक करण्यासाठी केला जातो. 

इन्संट्ंट आणि रेडी टू इट या प्रकारांमुळे सगळ्यांचाच घरातील किचनचे रूप पालटले आहे.  सरूवातीच्या काळात  एखादा पदार्थ कुटण्यासाठी म्हणजेच बारिक करण्यासाठी पाटा वरवंटा आणि खलबत्त्याचा वापर केला जात होता. आता फार कमी लोकांच्या घरात ही संस्कृती दिसून येते.  ग्रामीण भागात काही प्रमाणात ही पध्दत वापरली जाते.

सध्याच्या जमान्यात प्रत्येक घरातल्या स्त्रिया  या कामासाठी बाहेर पडत असल्यामुळे त्यांना फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कोणतेही काम लवकर कसं होईल याचा प्रयत्न करत असतात. पण जुन्या पारंपारीक पध्दतींचे अनेक फायदे आहेत.  चला तर मग जाणून घेऊया चटणी, मिरची, कांदा, लसूण यांची पेस्ट करण्यासाठी तुम्ही जर पाटा वरवंटा किंवा खलबत्त्याचा वापर केलात तर काय  फायदे होतात.


पदार्थाला चव येते

मिरची मसाला बारिक  करण्यासाठी जर तुम्ही पाटा वरवंट्याचा वापर केलात तर पदार्थाला चव येते. एका प्रकारचा नैसर्गिक स्वाद त्यात असतो. सर्वसाधारणपणे मशीनच्या वापरामुळे स्वाद कमी होत असतो . मिक्सरमध्ये बारीक केलेल्या वाटणापेक्षा पाटा वरवंट्याचा वापर करून तयार केलेले वाटण  पदार्थाला चविष्ट बनवते. 

भूक वाढते

जेव्हा तुम्ही खलबत्त्याचा वापर करून मसाला वाटत असता तेव्हा त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो आणि हा स्वाद आकर्षित करत असतो. त्यामुळे जेवण्याची इच्छा तीव्र होते. आणि भूकेची जाणीव होते. 

शरीर  उत्तम राहतं 

पाटा वरवंट्याचा वापर करुन जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ बारिक करत असाल तर व्यायाम होत असतो. त्यामुळे स्नायू व्यवस्थीत राहतात. तसंच कॅलरीज बर्न होण्यास मदत होत असते. त्यामुळे तुम्हाला खूप घाम येतो आणि वजन कमी होण्यास फायदेशीर ठरतं असतं.

सिजर डिलीव्हरी होण्याची शक्यता कमी होते.

सध्याच्या काळात शहरी भागात प्रत्येक महिलेची सिजर डिलिव्हरी होताना दिसून येतं. हेच ग्रामीण  भागात सिजर डिलाव्हरी होण्याचं प्रमाण कमी आहे. कारण ग्रामीण भागातील महिला पाटा वरवंट्याच्या सहाय्याने  मसाला वाटत असतात.  ही क्रिया करत असताना त्यांच्या गर्भाशयाचा व्यायाम सुध्दा होत असतो. तसंच पाटा वरंवट्याच्या वापराचे अनेक फायदे आहेत.  शिवाय या पध्दतीच्या वापराने विजेची सुद्धा बचत  होते.
 

Web Title: benefits of grind chutneys in traditional way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.