Intermittent Fasting केल्यानं होतात 'हे' गंभीर आजार कायमचे बरे, संशोधतानून नवा खुलास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 05:31 PM2021-09-27T17:31:55+5:302021-09-27T17:34:38+5:30
एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ठराविक वेळेत खाण्याचा उपवास (Intermittent fasting) केल्याने काही गंभीर आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते.
भारतीय जीवनशैलीमध्ये उपवासाला विशेष महत्त्व आहे. उपवास हा केवळ श्रद्धा आणि भक्तीशी संबंधित नाही, तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे वजन संतुलित राहते, पचन यंत्रणेला आराम मिळतो, कॉलेस्टेरॉल कमी होते आणि मानसिक शांती मिळते. उपवासाने देखील मन शांत राहण्यास मदत मिळते. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ठराविक वेळेत खाण्याचा उपवास (Intermittent fasting) केल्याने काही गंभीर आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते.
संशोधकांच्या मते, उपवासाची ही पद्धती आपण जीवनशैलीत समाविष्ट केली तर त्यामुळे डायबिटीस आणि उच्च रक्तदाबापासून आराम मिळू शकतो. या अभ्यासाचे निष्कर्ष एंडोक्राइन रिव्ह्यूज जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत, जे सायन्स डेलीने देखील प्रकाशित केले आहे.
कॅलिफोर्नियामधील साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीजचे प्राध्यापक सच्चिदानंद पांडा म्हणाले, “ठराविक वेळेत जेवून (Intermittent fasting) उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी जागृक असलेल्यांनी ते काय खातात यासोबतच त्यांनी काय आणि कधी खावे याकडेही लक्ष दिले पाहिजे. उपवासाची ही पद्धत लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
ठराविक वेळात खाणे ही उपवास किंवा आहाराची एक पद्धत आहे. ज्यामध्ये एका विशिष्ट वेळापर्यंत काहीह न खाता त्यानंतर अन्न खाल्ले जाते. याचा प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर अन्न खाल्ले जाते. कोणत्या वेळी अन्न खावे आणि कोणत्या वेळी नाही, हे ठरवले जाते. काही लोक १२ तासांच्या उपवासानंतर अन्न खातात. काही १४ ते १८ तास काहीही खात नाहीत, पण जेव्हा ते अन्न खातात तेव्हा ते कमी कार्बोहायड्रेट आणि अधिक प्रथिने आणि फायबर घेतात.