डाळीचे पाणी प्याल तर शिवणारही नाहीत आजार, फायदे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 04:44 PM2021-08-09T16:44:57+5:302021-08-09T17:04:33+5:30

कोरोना काळात जर दररोज एक कप डाळीचं पाणी प्यायल्यास, तुमच्या शरीरात तयार झालेले अनवाश्यक घटक निघून जातात आणि तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल. जाणून घ्या डाळीच्या पाण्याच्या सेवनाचे फायदे...

benefits of lentil water, dal water. drink it to boost your immunity during corona | डाळीचे पाणी प्याल तर शिवणारही नाहीत आजार, फायदे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे!

डाळीचे पाणी प्याल तर शिवणारही नाहीत आजार, फायदे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे!

googlenewsNext

कोरोनाकाळात (corona) रोगप्रतिकारक शक्ती (immunity power) वाढवण्यावर सर्वांचा भर असतो. डाळ एकप्रकारे इम्युनिटी बुस्टर आहे. डाळीच पाणी पौष्टीक आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचं पाणी पिऊ शकता. डाळीच्या पाण्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेड आणि फॉस्फरस असतं. या पाण्यामुळे अ‍ॅनेमियाचा त्रास कमी होतो. कोरोना काळात जर दररोज एक कप डाळीचं पाणी प्यायल्यास, तुमच्या शरीरात तयार झालेले अनवाश्यक घटक निघून जातात आणि तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल. डाएट एक्सपर्ट रंजना सिंह यांनी झी न्युजला डाळीच्या पाण्याच्या सेवनाचे फायदे सांगितले आहेत.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवते
डाळीच्या पाण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि शरीरातून पारा आणि शिसं सारख्या जड धातूंचा निचरा होतो. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम असतंच. त्याबरोबर व्हिटॅमिन-सी,कार्ब्स आणि प्रोटीन्स आणि डायटरी फायबर देखील असतात. याचे ग्लाइसेमिक इंडेक्ससुद्धा खूप कमी आहेत.

वजन कमी करते
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात डाळीच्या पाण्याचा समावेश करा. त्यामुळे कॅलरीज कमी होतातच त्यासोबत भूकेवरही नियंत्रण राहते.

मेंदुसाठी उपयुक्त
डाळीचं पाणी सहज पचतं. हे शरीर आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. हलकं असल्यामुळे शरीरात वायू तयार होतो. पोटाच्या समस्येपासून मुक्तता मिळते.

लुजमोशनवर आराम
लूज मोशन होत असतील तर, एक वाटी डाळ पाणी प्याल्याने आराम मिळतो. शरीरातील पाण्याची कमतरताच पूर्ण करण्याबरोबर लूज मोशनही कमी होतात.

Web Title: benefits of lentil water, dal water. drink it to boost your immunity during corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.