खोबऱ्याचं तेल आणि तुरटी एकत्र करून लावण्याचे काय होतात फायदे? वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:25 AM2024-07-26T10:25:12+5:302024-07-26T10:25:45+5:30
जास्तीत जास्त लोकांना तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Coconut benefits : तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये अनेक अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. याचा वापर वेगवेगळ्या उपचारांमध्ये केला जातो. दोन्ही गोष्टींमध्ये वेगवेगळे गुण असतात. जे तुम्हाला वेगवेगळे फायदे देतात. पण जास्तीत जास्त लोकांना तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचे फायदे
- तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये अनेक महत्वाचे तत्व असतात. जे घासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. तुरटीमधील तत्व आणि खोबऱ्याच्या तेलातील तत्व बेस्ट स्किन टोनसारखे काम करतात.
- तुरटी आणि खोबऱ्याच्या मिश्रणाने पिंपल्स दूर करण्यासही मदत मिळते. तुरटीमधील अॅंटी-सेप्टीक गुण इन्फेक्शन रोखण्यास मदत करतात. तर खोबऱ्याचं तेल हीलिंगचं काम करतं.
- खोबऱ्याच्या तेलाममध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. जे केसांमध्ये होणारं इन्फेक्शन दूर करतात. सोबतच केसांना मुलायम करण्याचं काम करतात.
- सोबतच केसांना याचं मिश्रण लावल्याने कोजेजनचं उत्पादन अधिक होतं. याने केस काळे राहण्यास मदत मिळते आणि केस पांढे होत नाहीत.
कसं वापराल यांचं मिश्रण?
एका वाटीमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल घ्या आणि ते गॅसवर गरम करा. यात तुरटी बारीक करून टाका. यांचं चांगलं मिश्रण करा. कोमट असताना हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावा. हलक्या हाताने मसाज करा. अर्धा तास तसंच ठेवा नंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय कराल तर तुम्हाला खूप दिसून येईल.