हिवाळ्यात नाभीवर 'या' तेलाचे दोन थेंब टाकण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 02:39 PM2023-12-20T14:39:00+5:302023-12-20T14:39:31+5:30

Mustard oil on the navel : मोहरीच्या तेलात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गूण भरपूर असतात. त्यामुळे आयुर्वेदात याला फार महत्व आहे.

Benefits of applying mustard oil on the navel during winters | हिवाळ्यात नाभीवर 'या' तेलाचे दोन थेंब टाकण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्

हिवाळ्यात नाभीवर 'या' तेलाचे दोन थेंब टाकण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्

Mustard oil on the navel : हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक मोहरीच्या तेलाचा वापर करतात. थंडीच्या दिवसात हे तेल फार फायदेशीर असतं. अनेक लोक मोहरीच्या तेलात जेवण बनवतात, तर काही लोक त्वचेवर खाज, कोरडेपणा आणि उलल्याने मोहरीचं तेल लावतात. इतकंच नाही तर याचा वापर पारंपारिक चिकित्सेतही वेगवेगळ्या आजारांवर उपचार म्हणून केला जातो.

मोहरीच्या तेलात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गूण भरपूर असतात. त्यामुळे आयुर्वेदात याला फार महत्व आहे. पण हे तेल कधी तुम्ही नाभीमध्ये टाकण्याबाबत ऐकलंय का? ही एक जुनी आयुर्वेदिक चिकित्सा आहे. असं मानलं जातं की, हिवाळ्यात नाभीवर हे तेल लावल्याने एकूण आरोग्यात सुधारणा होते. चला जाणून घेऊ याबाबत अजून काही....

उष्णता मिळते

मोहरीचं तेल हे उष्ण असतं. पारंपारिक चिकित्सेनुसार, नाभीवर मोहरीचं तेल लावण्याने शरीरात उष्णता निर्माण करण्याची क्षमता वाढते. असं केल्याने तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि आरामही मिळेल.

ब्लड सर्कुलेशन वाढतं

जसे आधी सांगितलं की, मोहरीचं तेल हे उष्ण असतं. जेव्हा हे आपण नाभीवर लावतो तेव्हा शरीरातील उष्णता बाहेर निघते ज्यामुळे ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते. याने ब्लड फ्लोमध्ये वाढ होऊन शरीराला पोषण मिळतं.

जॉईंटच्या वेदनांपासून आराम

हिवाळ्यात मांसपेशी आणि जॉईंटमध्ये वेदना होण्याची समस्या वाढते. खासकरून वयोवृद्धांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. असं म्हणतात की, जर नाभीमध्ये तीन ते चार थेंब मोहरीचं तेल लावलं तर यामुळे उष्णता कमी करणारे आणि वेदना कमी करणारे गुण शरीरात पसरतात. ज्यामुळे मांसपेशी आणि जॉईंट्समध्ये आराम मिळतो.

Web Title: Benefits of applying mustard oil on the navel during winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.