ताण दूर करण्यापासून ते पोटासंबधी समस्यांवरील इलाज, काळी मिरीच्या तेलाचे फायदे भरपूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 10:14 AM2022-08-15T10:14:35+5:302022-08-15T10:20:11+5:30
त्वचेशी संबंधित समस्या जसे की मुरुम, सुरकुत्या, डाग यापासून संरक्षण करू शकते. चला जाणून घेऊया काळी मिरी तेलाचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत.
आयुर्वेदात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी काळी मिरीचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. भारतीय स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांमध्येही काळी मिरी वापरली जाते. त्याची चव तिखट असते, परंतु या लहान काळ्या-काळ्या दाण्यांमध्ये खूप फायदेशीर गुणधर्म आहेत, ज्याचा एकंदर आरोग्यासाठी फायदा होतो. काळी मिरीपासून इसेन्शियल ऑइलदेखील तयार केले जाते. या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्याचा उपयोग त्वचा निरोगी ठेवण्यासाठीदेखील केला जातो. त्वचेशी संबंधित समस्या जसे की मुरुम, सुरकुत्या, डाग यापासून संरक्षण करू शकते. चला जाणून घेऊया काळी मिरी तेलाचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत.
काळी मिरी तेलाचे आरोग्य फायदे
- greenfootmama.com मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, काळी मिरीपासून तयार केलेले इसेन्शियल ऑइल चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. हे तेल नसा शांत करून तुमच्या स्नायूंना आराम देते. यामुळे तुम्हाला शांततेची अनुभूती मिळते. तुमच्या भावनांमध्ये संतुलन राखते, तसेच मूडमध्ये कमालीची सुधारणा करू शकते. जर तुम्ही धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर काळी मिरी तेल धूम्रपान करण्याची इच्छादेखील कमी करण्यास मदत करते.
- काळ्या मिरीच्या इसेन्शियल ऑइलमध्ये एक विशिष्ट सुगंध असतो, ज्यामुळे भूक वाढण्यास मदत होते. मेंदूचा इन्सुला ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा भागदेखील काळी मिरी तेलाच्या सेवनाने सक्रिय होऊ शकतो. हे आपल्या गिळण्याच्या गतीस मदत करते. ज्यांना स्ट्रोक आला आहे किंवा गिळण्यास त्रास होत आहे अशा लोकांसाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.
- काळ्या मिरीपासून तयार केलेले तेल पोटासाठी आणि पचनशक्तीसाठी चांगले असते. हे पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिडचे स्राव सुधारते. या तेलामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते, त्यामुळे जुलाब आणि बद्धकोष्ठता होत नाही.
- जर तुम्हाला सायनसची समस्या असेल तर काळी मिरीपासून तयार केलेले आवश्यक तेल तुम्हाला आराम देऊ शकते. हे तेल कोंडलेले नाक उघडण्याचा एक चांगला मार्ग आहे. श्वसन प्रणालीमध्ये उपस्थित कफ आणि श्लेष्मा कमी करण्यासाठीदेखील हे प्रभावी आहे.
- काळी मिरी तेल संधिवात सारख्या समस्यांना देखील प्रतिबंधित करते. हे रक्ताभिसरण सुधारते आणि संधिवातापासून आराम देते. तसेच शरीरातून युरिक ऍसिड सारखे विषारी पदार्थ बाहेर टाकतात.
- या तेलामध्ये कार्मिनेटिव्ह नावाचे घटक असतात, जे पोट आणि आतड्यांमध्ये तयार होणारा वायू कमी करण्यास मदत करतात. तसेच अतिरिक्त वायू तयार होऊ देत नाहीत. ते वायू निर्माण करणाऱ्या जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करते.
झपाट्याने वजन कमी झाल्यास दुर्लक्ष करू नका, डिप्रेशनसोबत कॅन्सरचाही वाढतो धोका
- काळ्या मिरीच्या बाहेरील थरामध्ये एक संयुग असते जे चरबीच्या पेशींचे विघटन करण्यास चालना देते, ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या चरबी लवकर कमी होऊ शकते.
- त्वचेशी संबंधित समस्या त्वचारोगासाठी काळी मिरी तेलदेखील खूप प्रभावी मानले जाते. त्वचारोगामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात. काळी मिरी तेल रंगद्रव्य उत्पादनास उत्तेजन देते.