दुधी भोपळ्यापेक्षाही फायदेशीर असते त्याची साल, फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 10:23 AM2022-10-05T10:23:03+5:302022-10-05T10:23:18+5:30
Bottle Gourd Benefits: दुधी भोपळ्याच्या सालीत अनेक पोषक तत्व असतात. या सालीमध्ये अनेक औषधी गुण असतात. जे शरीरासाठी गरजेचे असतात.
Bottle Gourd Benefits: लौकी म्हणजे दुधी भोपळ्यात न्यूट्रिएंट्स भरपूर असतात. यात अनेक पौष्टिक तत्व आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. केवळ दुधी भोपळाच नाही तर त्याची सालही खूप फायद्याची आहे. दुधी भोपळ्याच्या सालीत अनेक पोषक तत्व असतात. या सालीमध्ये अनेक औषधी गुण असतात. जे शरीरासाठी गरजेचे असतात.
भरपूर न्यूट्रिएंट्स
दुधी भोपळ्याच्या सालीमध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी, बी1, बी2, बी3, बी5 आणि बी6 असतात. तसेच यात कॅल्शिअम, आयरन, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅग्नीजसारखे मिनरल्स असतात. हे पोषक तत्व शरीराच्या अनेक समस्या दूर करतात.
केसांसाठी फायदेशीर
आजकाल केसगळण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अशात दुधी भोपळ्याची साल फारच फायदेशीर असते. ही तिळाच्या तेलात मिक्स करून डोक्याच्या त्वचेवर लावली तर केसगळतीची समस्या दूर होऊ शकते.
पाइल्समध्ये फायदेशीर
पाइल्स समस्या दूर करायची असेल तर दुधी भोपळ्याची साल फार फायदेशीर ठरते. दुधी भोपळ्याची साल सुकवून त्याचं पावडर तयार करा. पाइल्स समस्या झाल्यावर याचं सेवन केलं तर तुम्हाला आराम मिळू शकतो.
त्वचेच्या समस्या दूर करा
दुधी भोपळा हा थंड असतो. जर तुम्हाला एखादी त्वचेसंबंधी समस्या असेल तर याचा वापर करू शकता. याने चेहऱ्यावर ग्लो येतो. जळजळ दूर करण्यासाठी आणि थंडाव्यासाठी तुम्ही दुधी भोपळ्याची साल बारीक करून जळजळ होत असलेल्या जागेवर लावा.
वजन कमी करा
दुधी भोपळ्यात फायबर भरपूर असतं. दुधी भोपळ्याच्या सालीमध्ये असलेलं फायबर मेटाबॉलिज्म मजबूत ठेवतं आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही दुधी भोपळ्याचा ज्यूसही सेवन करू शकता.