१ महिना रोज सकाळी रिकाम्या पोटी खा 'ही' पाने, काही दिवसात दिसतील आश्चर्यकारक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:56 AM2024-11-07T10:56:39+5:302024-11-07T10:58:05+5:30
Curry Leaves Benefits On Empty Stomach Benefits: एक्सपर्ट सांगतात की, जर तुम्ही एक महिना रोज सकाळी रिकाम्या पोटी ५ ते ७ कढीपत्त्यांचं सेवन केलं तर शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतील.
Curry Leaves Benefits On Empty Stomach Benefits: कढीपत्त्यांचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खासकरून साऊथ इंडियात कढीपत्त्यांचा वापर अधिक दिसतो. याने पदार्थांची टेस्ट वाढते आणि एक वेगळा सुगंधही मिळतो. तसेच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. अशात एक्सपर्ट सांगतात की, जर तुम्ही एक महिना रोज सकाळी रिकाम्या पोटी ५ ते ७ कढीपत्त्यांचं सेवन केलं तर शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतील.
रिसर्चनुसार, कढीपत्त्यामध्ये आयर्न, प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, अॅंटी-ऑक्सिडेंट्स असे अनेक पोषक तत्व आढळतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यास ही पाने महत्वाची भूमिका बजावतात. अशात तुम्ही रोज काही पाने खाऊन वरून हलकं कोमट पाणीही पिऊ शकता. याने याचा फायदा डबल होईल.
काय होतात फायदे?
पचन तंत्र सुधारतं
रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची काही पाने खाल्ल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. यात फायबर असतं, जे पचनक्रिया चांगली करण्यास मदत करतं. यामुळे पचन तंत्र निरोगी राहतं आणि अन्न सहजपणे पचन होतं. जर नियमितपणे या पानांचं सेवन केलं तर गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होतात.
ब्लड शुगर कंट्रोल राहते
रोज सकाळी रिकाम्या पोटी या पानाचं सेवन केल्यास डायबिटीसच्या रूग्णांना खूप फायदा मिळू शकतो. यात हायपोग्लायसेमिक गुण आढळतात, जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात. याने शरीरात इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यास मदत मिळते. या पानांच्या नियमित सेवनाने टाइप-२ डायबिटीसचा धोकाही कमी केला जाऊ शकतो.
वजन होईल कमी
जर १ महिना तुम्ही या पानांचं रोज सेवन केलं तर याने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल. या पानांच्या सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे शरीरातील एक्स्ट्रा कॅलरी वेगाने बर्न होतात. त्याशिवाय याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यासही मदत मिळते. या पानांनी भूक कंट्रोल होते, याचा थेट फायदा वजन कमी करण्यास मिळतो.
इम्यूनिटी बूस्ट होते
रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची काही पाने खाल्ल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. कारण यात भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे इम्यूनिटी बूस्ट करण्याचं काम करतात. त्यामुळे तुमचा अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकतो.
डोळ्यांची दृष्टी चांगली होईल
कढीपत्त्याच्या पानांच्या मदतीने तुम्हाला डोळ्यांची दृष्टी आणखी वाढवण्यास मदत मिळेल. यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत मिळते. तसेच या पानांनी वाढत्या वयासोबत डोळ्यांसंबंधी होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासही मदत मिळते.
कसं कराल यांचं सेवन?
सकाळी रिकाम्या पोटी ५ ते ७ कढीपत्त्याची पाने चावून खावीत. त्यानंतर एक ग्लास पाणी पिऊ शकता. एक महिने जर तुम्ही नियमितपणे या पानांचं सेवन केलं तर तुम्हाला काही दिवसांमध्येच आरोग्यात फरक दिसून येईल.