स्वयंपाकघरातील 'हा' मसाला जेवणाची लज्जत वाढवतो, पण याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 05:53 PM2022-06-05T17:53:00+5:302022-06-05T17:55:00+5:30
रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदयविकार टाळण्यास देखील दालचिनी खूप उपयुक्त आहे. इतकेच नाही तर त्यात असे अनेक गुणधर्म आहेत जे कर्करोग, एचआयव्ही, बुरशीजन्य संसर्ग, न्यूरोलॉजिकल रोग इत्यादी आरोग्य समस्यांपासून आपले संरक्षण करू (Health Benefits Of Cinnamon) शकतात.
साधारणपणे आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी दालचिनीचा वापर करतो. अनेक वर्षांपासून याचा वापर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही केला जात आहे. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि या कारणास्तव तिला सुपर फूडचा दर्जा दिला गेला आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदयविकार टाळण्यास देखील दालचिनी खूप उपयुक्त आहे. इतकेच नाही तर त्यात असे अनेक गुणधर्म आहेत जे कर्करोग, एचआयव्ही, बुरशीजन्य संसर्ग, न्यूरोलॉजिकल रोग इत्यादी आरोग्य समस्यांपासून आपले संरक्षण करू (Health Benefits Of Cinnamon) शकतात.
दालचिनीचे फायदे -
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध
दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. आपल्याला अनेक आजारांपासून ते वाचवतात. एवढेच नाही तर फ्री रॅडिकल्सपासूनही आपले संरक्षण करण्यासाठी दालचिनी उपयोगी आहे.
सूज कमी होते -
दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, शरीराच्या ऊतींमध्ये कुठेही जळजळ कमी करण्यास आणि बरे करण्यास त्यामुळे मदत होते.
हृदय निरोगी -
दालचिनीचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो. हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर असे जीवघेणे आजार होण्याची शक्यता कमी होते.
मधुमेह विरोधी गुणधर्म -
रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी दालचिनी खूप उपयुक्त आहे, ज्यामुळे मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहते.
मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर -
एखाद्या व्यक्तीने आपल्या दिनचर्येत दालचिनीचा समावेश केला तर अल्झायमर, पार्किन्सन्स अशा अनेक मानसिक समस्या नियंत्रणात राहतात.
कर्करोग -
संशोधनात असे आढळून आले आहे की, दालचिनी कर्करोगापासून बचाव आणि उपचारादरम्यान खूप फायदेशीर ठरते.
घसा खवखवणे -
चिमूटभर दालचिनी पावडर आणि चिमूटभर काळी मिरी कोमट पाण्यात मध मिसळून घेतल्याने घसादुखी आणि सर्दी कमी होते.
लठ्ठपणासाठी -
दालचिनी चयापचय वाढवते. ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांनी दालचिनीचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणाची समस्याही कमी होते.
बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षण -
दालचिनीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. संक्रमणापासून संरक्षण करण्यास आपल्याला मदत होते. अशा प्रकारे दालचिनीचा आहारात समावेश करून आपण अनेक फायदे मिळवू शकता.