Health tips: छोट्या दवबिंदुंमुळे वजन होतं कमी, या दिवसांत सकाळी बाहेर गेल्यावर करा 'असा' उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 05:15 PM2022-07-01T17:15:12+5:302022-07-01T17:23:32+5:30

हिरवळीवर चालणं, लहान दवबिंदू पाहणं, त्यांना स्पर्श करणं आणि ओल्या गवतावर चालणं याने मन प्रसन्नदेखील होतं आणि याचे अनेक फायदेदेखील (Morning Dew Benefits) आहेत.

benefits of dews for health | Health tips: छोट्या दवबिंदुंमुळे वजन होतं कमी, या दिवसांत सकाळी बाहेर गेल्यावर करा 'असा' उपयोग

Health tips: छोट्या दवबिंदुंमुळे वजन होतं कमी, या दिवसांत सकाळी बाहेर गेल्यावर करा 'असा' उपयोग

googlenewsNext

सकाळी सकाळी झाडे, फुले, पाने, हिरवे गवत यावर पडलेले दवबिंदू (Morning Dew) पाहून मन प्रफुल्लीत होते. असे म्हणतात की दवबिंदूंनी झाकलेल्या गवतावर चालण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवण्याइतका वेळ कोणाकडेच नाही. मात्र हिरवळीवर चालणं, लहान दवबिंदू पाहणं, त्यांना स्पर्श करणं आणि ओल्या गवतावर चालणं याने मन प्रसन्नदेखील होतं आणि याचे अनेक फायदेदेखील (Morning Dew Benefits) आहेत.

दवबिंदू जितके लहान दिसतात तितकेच त्यांचे आरोग्यावर होणारे फायदे जास्त असतात. दवबिंदू हा एक छोटासा थेंब आरोग्यासाठी कसा फायदेशीर ठरतो हे जाणून घेऊया.

दवबिंदूचे आरोग्यास होणारे फायदे (Morning Dew Health Benefits)
- DoctorHealthBenefits.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सकाळचे दवबिंदू पाण्याच्या वाफांमधून तयार होतात. हे दवबिंदू थंड मानले जातात. एका संशोधनानुसार, त्यात 14-16 पीपीएम पर्यंत भरपूर ऑक्सिजन असतो. दव थेंब एका भांड्यात गोळा करून चेहऱ्यावर लावल्यास (Morning Dew Is Good For Skin) त्वचेला खूप फायदा होतो.

- दिवसभर काम करून शरीर थकते. शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते. शारीरिकदृष्ट्या काही लोकांना कठोर परिश्रम केल्यामुळे अशक्तपणा जाणवू लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही सकाळचे दव गोळा करून ते पिऊ शकता. हे शरीर ताजेतवाने करते (Morning Dew Gives Energy) आणि तुम्हाला दिवसभरातील सर्व कामांसाठी स्वतःला तयार करण्यास मदत करते.

- सकाळच्या दवबिंदूंमधे ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे ते त्वचेसाठी योग्य असते. या दवबिंदूंमुळे पिंपल्स आणि फ्रिकल्स होत नाहीत. जर तुम्हाला आधीच पुरळ असेल तर सकाळचे दव नियमितपणे त्वचेवर लावा. तुम्ही ते पिऊ शकता किंवा चेहऱ्यावर स्प्रे करू शकता.

- सकाळी उठल्यानंतर तुमचे डोळे लाल दिसत असतील तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या त्रास होत असलेल्या डोळ्यांमध्ये सकाळच्या ताज्या दवबिंदूंचे काही थेंब टाकू शकता. यामुळे डोळेही निरोगी राहतील (Morning Dew Is Good For Eyes) आणि दृष्टीही वाढेल.

- मुरुमांव्यतिरिक्त, काही लोकांना जास्त प्रमाणात सेबम किंवा तेलकट त्वचेचा त्रास होतो. सकाळचे दवबिंदू चेहऱ्यावर लावल्याने किंवा गोळा करून प्यायल्याने चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो. तेलकट त्वचा देखील जास्त सीबममुळे होते.

- सकाळच्या दवबिंदूंचे सेवन केल्याने शरीरातील विषारी किंवा हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.

- अनेक प्रकारचे व्हायरस, बॅक्टेरिया आपल्या सभोवतालच्या वातावरणात फिरत असतात. जे आपल्याला कधीही आजारी आणि संक्रमित करू शकतात. विशेषत: हे व्हायरस किंवा बॅक्टेरिया अशा लोकांना संक्रमित करतात, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. अशा परिस्थितीत रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सकाळचे दवबिंदू गोळा करून या पाण्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.

- एका संशोधनानुसार, सकाळी नियमितपणे दवबिंदू प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. याच्या मदतीने तुम्ही पक्षाघात, हृदयविकाराचा धोकाही टाळू शकता.

- सकाळचे दवबिंदू वजन कमी करण्यासाठीदेखील प्रभावी ठरू शकतात. अशा परिस्थितीत वजन कमी करण्याचा आहार, व्यायाम करण्यासोबतच दवबिंदू पिणे सुरू करा.

 

Web Title: benefits of dews for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.