हिवाळ्यात पाण्यात मिक्स करून प्या 'ही' एक गोष्ट, वजन होईल कमी अन् बॉडी होईल डिटॉक्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:10 AM2024-10-31T10:10:49+5:302024-10-31T10:12:21+5:30

Apple Cider Vinegar: जे लोक त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे हैराण आहेत, त्यांनी याचा त्यांच्या आहारात समावेश करावा. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे काय काय फायदे होतात तेच आज जाणून घेणार आहोत.

Benefits of drinking apple cider vinegar mixed in water | हिवाळ्यात पाण्यात मिक्स करून प्या 'ही' एक गोष्ट, वजन होईल कमी अन् बॉडी होईल डिटॉक्स!

हिवाळ्यात पाण्यात मिक्स करून प्या 'ही' एक गोष्ट, वजन होईल कमी अन् बॉडी होईल डिटॉक्स!

Apple Cider Vinegar: अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. याचे वेगवेगळे फायदे देखील आहेत. याने वजन कमी करण्यास आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर अनेक डाएट प्लानमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. जे लोक त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे हैराण आहेत, त्यांनी याचा त्यांच्या आहारात समावेश करावा. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे काय काय फायदे होतात तेच आज जाणून घेणार आहोत.

काय आहे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर?

सोप्या भाषेत सांगायचं तर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर सफरचंदाचा ज्यूस फर्मेंट करून तयार करण्यात येतं. हे बाजारात सहजपणे मिळतं. हेल्दी लाइफस्टाईलसाठी एक्सपर्ट्सही याच्या सेवनाचा सल्ला देत असतात.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचे फायदे?

वजन कमी होईल 

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी होणं. याचा आहारात समावेश केल्याने भूक कमी लागते. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर सतत काहीतरी खाण्याची क्रेविंग कमी होते. त्यामुळे तुम्हाला सतत भूक लागत नाही आणि वजन कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते.

ब्लड शुगर कंट्रोल

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या व्हिनेगरच्या मदतीने ओव्हरईटिंग टाळता येतं. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते. इतकंच नाही तर शुगरसंबंधी वेगवेगळ्या समस्याही याने दूर होतात.

मेटाबॉलिज्म बूस्ट होतं

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचं सेवन मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी केलं जातं. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर कॅलरी बर्न करण्यासही मदत करतं.

फॅट कंट्रोल करतं

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड असतं, जे पोट आणि लिव्हरवरील फॅट कमी करतं. पोट आणि लिव्हर हेल्दी राहिल्याने शरीरही निरोगी राहतं. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते.

बॉडी डिटॉक्स

डायजेशन सिस्टीम मजबूत करण्यासाठी अ‍ॅप्पल व्हिनेगर फायदेशीर ठरतं. तसेच अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ सुद्धा बाहेर काढण्यास मदत मिळते.

कसं कराल सेवन?

एक ग्लास साध्या पाण्यात एक ते दोन चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर टाकून सेवन करू शकता. दिवसातून दोनदा याचं सेवन करू शकता. रात्री झोपण्याआधी याचं सेवन करणं जास्त फायदेशीर मानलं जातं.

Web Title: Benefits of drinking apple cider vinegar mixed in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.