कॉफी शरीराला अपायकारक? नवे संशोधन काय सांगते पाहा, तुमचा बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:17 PM2022-01-21T18:17:16+5:302022-01-21T18:24:07+5:30

एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, कॉफी प्यायल्याने पचनशक्ती ( Digestive power ) आणि आतड्यांवर ( Gut ) सकारात्मक परिणाम होतो. एवढेच नाही तर पित्ताशयातील खडे आणि यकृताच्या अनेक आजारांपासून ( Liver Diseases) बचाव होतो.

benefits of drinking coffee according to new study | कॉफी शरीराला अपायकारक? नवे संशोधन काय सांगते पाहा, तुमचा बसणार नाही विश्वास

कॉफी शरीराला अपायकारक? नवे संशोधन काय सांगते पाहा, तुमचा बसणार नाही विश्वास

googlenewsNext

कॉफी (Coffee) पिण्याचे अनेक फायदे आणि तोटे असल्याचे बऱ्याचवेळा समोर आलं आहे. त्यामुळे हे कॅफीन ( Caffeine ) युक्त पेय ( Drinkable item) प्यावं की नाही ? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. आता आणखी एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, कॉफी प्यायल्याने पचनशक्ती ( Digestive power ) आणि आतड्यांवर ( Gut ) सकारात्मक परिणाम होतो. एवढेच नाही तर पित्ताशयातील खडे आणि यकृताच्या अनेक आजारांपासून ( Liver Diseases) बचाव होतो.

फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रिसर्चच्या (French National Institute of Health and Medical Research) शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष 'न्यूट्रिएंट' ( Nutrient ) जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. या नवीन अभ्यासात यापूर्वी प्रकाशित झालेल्या 194 अभ्यासांचा आढावा घेतल्यानंतर हे समोर आले आहे की, कॉफीच्या मर्यादित सेवनाने शरीरातील पचनसंस्थेशी संबंधित अवयवांना कोणतीही हानी होत नाही. त्यामुळे दररोज 3 ते 5 कप कॉफी घेणं चांगले. कॉफीशी संबंधित दोन विशेष मुद्द्यांवर करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये आजकाल अनेकांना खूप रस आहे. एक म्हणजे कॉफी पित्ताशयातील खड्डयांचा (Gallstones) धोका कमी करते का ? आणि दुसरा म्हणजे कॉफी पिण्याचा स्वादुपिंडाचा (Pancreatic) धोका कमी करण्याशी संबंध आहे का ? अर्थात याची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.

नुकत्याच झालेल्या अभ्यासात असं समोर आले आहे की, 'कॉफीच्या सेवनाने इतर अनेक रोगांपासून संरक्षण मिळते, त्यात हेपटोसेल्युलर कार्सिनोमा (hepatocellular carcinoma) म्हणजेच यकृताचा कॅन्सरचा समावेश आहे. कॉफी पचनाच्या पहिल्या टप्प्यात मदत करत असल्याचा पुरावा असूनही कॉफीचा गॅस्ट्रो-इसोफेगल रिफ्लक्सवर थेट परिणाम होतो, याची पुष्टी बहुतांश डाटा करीत नाही. तथापि, हे लठ्ठपणा आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांसारख्या इतर जोखिमांचा एकत्रित परिणाम देखील असू शकतो.'

'कॉफीचा पोटाशी किंवा पचनाच्या समस्यांशी संबंध नाही,' असे फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड मेडिकल रिसर्चचे संचालक अॅस्ट्रिड नेहलिग म्हणतात. कॉफी बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून देखील बचाव करत असल्याचे समोर आले आहे. काही डाटा असे सूचित करतो की, 'कॉफी बायफोडोबॅक्टेरिया सारख्या फायदेशीर जीवाणूंची पातळी वाढवते, हे सर्व असूनही, संपूर्ण पाचनयंत्रणेवर कॉफीचा प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अद्याप अधिक अभ्यास आवश्यक आहेत.

कॉफीचे तीन महत्त्वाचे परिणाम
-कॉफी जठरासंबंधी, पित्तविषयक आणि स्वादुपिंडाच्या स्रावांशी संबंधित आहे, जे अन्नाच्या पचनासाठी आवश्यक आहे. कॉफी हे पाचक हार्मोन गॅस्ट्रिनचे उत्पादन आणि गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये असलेल्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचे उत्पादन उत्तेजित करते. हे दोन्ही पदार्थ पोटातील अन्नघटक विघटित करण्यास मदत करतात.

- कॉफीमुळे आतड्याच्या मायक्रोबायोटाची रचना देखील बदलते. तसेच तिचा गॅस्ट्रोइंटिनल ट्रॅक्टमध्ये उपस्थित असलेल्या बिफिडोबॅक्टेरियाच्या संख्येवर परिणाम होतो.

 - कॉफीचा संबंध कोलन मोटिलिटी (colon motility) म्हणजे पचन मार्गातून अन्न जाण्याच्या प्रक्रियेशी आहे. कॉफीमुळे कोलन मोटीलिटी वाढते. कॅफीन मुक्त कॉफी 23 टक्क्यांनी मोटिलिटी ने गती वाढवते. यामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा धोकाही कमी होतो.

Web Title: benefits of drinking coffee according to new study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.