सकाळी रिकाम्या पोटी प्या मूग डाळीचं पाणी, फॅटी लिव्हरची समस्या होईल कमी; जाणून घ्या कसं बनवाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 02:24 PM2024-10-30T14:24:41+5:302024-10-30T14:25:09+5:30
Moong Dal Water Benefits : मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. जाणून घेऊ मूगाच्या डाळीचं पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्यापासून होणारे फायदे....
Moong Dal Water Benefits : सामान्यपणे आजारापणात रूग्णांना, लहान मुलांना किंवा एनर्जी मिळवण्यासाठी तुरीची डाळीचं पाणी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, तुरीच्या डाळीसोबत मूग डाळीचं पाणीही खूप पौष्टिक असतं. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. जाणून घेऊ मूगाच्या डाळीचं पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्यापासून होणारे फायदे....
मूग डाळीच्या पाण्यातील पोषक तत्व
एक कप मूग डाळीच्या पाण्यात प्रोटीन, फॅट, फायबर, फॉलेट, शुगर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक असतं. त्यासोबतच या डाळीच्या पाण्यात व्हिटॅमिन बी१, बी५, बी६, थियामिन, डायटरी फायबर आणि रेजिस्टेंट स्टार्चही भरपूर असतं. त्यामुळे या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.
फॅटी लिव्हरमध्ये फायदेशीर
मूग डाळीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि खास अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे पचन तंत्र मजबूत करण्यासोबतच लिव्हरचं कामकाजही चांगलं करतात. याचं पहिलं काम शरीर डिटॉक्स करणं आहे. फॅटी लिव्हरची समस्या असल्यावर जेव्हा सकाळी या डाळीच्या पाण्याचं सेवन कराल तर याने लिव्हर सेल्समध्ये जमा विषारी पदार्थ डिटॉक्स होतात आणि हे विषारी पदार्थ बाहेर पडतात. इतकंच नाही तर याने लिव्हरच्या वेगवेगळ्या क्रिया आणखी चांगल्या पद्धतीने होण्यास मदत मिळते. तसेच शरीरात कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं. कारण लिव्हरच तो अवयव आहे जो कोलेस्ट्रॉल बनवण्याच्या कामात महत्वाची भूमिका बजावतो.
लठ्ठपणा कमी होतो
धावपळीचं जीवन, कामाचा वाढता ताण, खाण्याच्या पिण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांमुळे होणारी एक मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीचं सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
विषारी पदार्थ बाहेर पडतात
मूग डाळीचं पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. याने शरीराची आतून स्वच्छता होते. सोबतच डाळीचं पाणी प्यायल्याने लिव्हर, गॉल ब्लॅडर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
मूग डाळीचं पाणी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबतच मूग डाळ ब्लड ग्लूकोजला नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. ज्याने डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.
डेंग्यूपासून बचाव
डेंग्यू डास चावल्याने होणारा एक गंभीर आजार आहे. अलिकडे तर या आजाराने सगळीकडेच थैमान घातलं आहे. अशात मूगाच्या डाळीचं पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. या डाळीचं पाणी सेवन करून इम्यून सिस्टम बूस्ट होतं, ज्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.
मूग डाळीचं पाणी कसं तयार कराल?
मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये दोन कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मूग डाळ टाका आणि चवीनुसार मीठ टाकून साधारण २ ते ३ शिट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. यातील पाणी वेगळं काढा. मूग डाळीचं पाणी पिण्यासाठी तयार आहे.