हळद टाकलेलं दूध की हळदीचं पाणी काय जास्त हेल्दी? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 02:32 PM2024-05-11T14:32:58+5:302024-05-11T14:33:21+5:30
Turmeric Benefits : कुणी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हळदीच्या पाण्याचं सेवन करण्यास सांगतात तर कुणी हळदीचं पिण्याचा सल्ला देता. पण या दोनपैकी जास्त फायदे कशापासून मिळतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Turmeric Benefits : हळद आरोग्यासाठी किती फायद्याची आहे हे सगळ्यांनाच माहीत असतं. भारतात तर हळदीचं वेगवेगळ्या माध्यमातून सेवन केलं जातं. खासकरून वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हळदीचा समावेश केला जातो. कुणी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हळदीच्या पाण्याचं सेवन करण्यास सांगतात तर कुणी हळदीचं पिण्याचा सल्ला देता. पण या दोनपैकी जास्त फायदे कशापासून मिळतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हळदीमध्ये करक्यूमिन तत्व असतं. या तत्वामुळे तुमच्या शरीरात असलेली कोणत्याही प्रकारची सूज दूर केली जाते. हळद दुधामध्ये टाकून प्याय तर तुम्हाला संधीवात आणि अंगदुखीची समस्याही होणार नाही.
तसेच करक्यूमिनसोबतच हळदीमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्व असतात. यामुळे इम्यूनिटी वाढण्यासोबतच शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
तर सकाळी रिकाम्या पोटी हळदीचं पाणी प्यायल्याने पित्त तयार होण्यास मदत मिळते. सोबतच पचन तंत्र चांगलं राहण्यासही मिळते. हळदीच्या दुधामुळे पोट फुगणं, गॅस आणि अपचन अशा समस्या दूर होण्यासही मदत मिळते.
गरम दुधात हळद टाकून सेवन केल्याने रात्री झोपही चांगली लागते. सोबतच मनही शांत राहतं. तसेच त्वचा आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं.
हळदीचं पाणी किंवा दूध प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. याने लिव्हर डिटॉक्स होतं. सोबत पूर्ण शरीराचं डिटॉक्सिफिकेशनही होतं.
मुळात दुधात हळद टाकून प्या किंवा हळदीचं पाणी प्या दोन्हींचे वेगवेगळे फायदे आहे. दोन्हींमुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. त्यामुळे दोन्हीपैकी कशाचंही सेवन तुम्ही करू शकता.