अरे व्वा! सकाळी उठल्यानंतर नेमकं किती पाणी प्यावं, गरम की थंड?; फायदे ऐकून व्हाल चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:42 IST2024-08-09T16:31:50+5:302024-08-09T16:42:43+5:30
सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे जाणून घेऊया...

अरे व्वा! सकाळी उठल्यानंतर नेमकं किती पाणी प्यावं, गरम की थंड?; फायदे ऐकून व्हाल चकीत
सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणं ही सवय अनेक जण अंगीकारतात. पण असे करण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे शरीराला कोणते फायदे होतात आणि किती प्रमाणात पाणी प्यावे.
सकाळी पाणी का प्यावं?
पचनक्रिया सुधारते
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
शरीराला ऊर्जा मिळते
सकाळी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जा मिळते.
त्वचेसाठी फायदेशीर
पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि ती चमकदार बनवते.
वजन कमी करण्यात उपयुक्त
पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.
किडनी निरोगी ठेवते
पाणी किडनी डिटॉक्स करण्यास मदत करते.
किती पाणी प्यावं?
सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावे हे प्रत्येक व्यक्तीनुसार आणि ऋतूनुसार बदलतं. साधारणपणे, सकाळी उठल्यानंतर तुम्ही किमान २-३ ग्लास पाणी पिऊ शकता. जर तुम्ही सुरुवातीला इतके पाणी पिऊ शकत नसाल तर एका ग्लासने सुरुवात करा आणि हळूहळू वाढवा.
कोमट की साधं पाणी?
तुम्ही सकाळी कोमट किंवा साधं पाणी पिऊ शकता. कोमट पाणी पचनक्रिया नॉर्मल करते आणि मेटाबॉलिज्म वाढवते. तसेच साध्या पाण्याने शरीराला ताजेतवाने वाटते.
सकाळी पाणी पिण्याचे इतर फायदे
स्नायू दुखणे कमी होते
व्यायामानंतर पाणी प्यायल्याने स्नायू दुखणे कमी होते.
डोकेदुखीपासून मिळतो आराम
पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.
मूड चांगला होतो
डिहायड्रेशनमुळे मूड खराब होऊ शकतो. पाणी प्यायल्याने मूड चांगला होतो.