जेवणानंतर बडीशेप आणि गूळ खाण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 01:53 PM2024-10-29T13:53:54+5:302024-10-29T13:54:47+5:30
Fennel Seeds For Digestion: अनेकांना हे माहीत नसतं की, गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. चला तर जाणून घेऊ याचे फायदे.
Fennel Seeds For Digestion: जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तेच जर बडीशेपबाबत सांगायचं तर यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, अॅंटी-ऑक्सिडेंट्स, एस्ट्रोगोल, फेनचोन आणि एथेनॉलसारखे गुण असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. चला तर जाणून घेऊ याचे फायदे.
गूळ आणि बडीशेपचे फायदे
१) पचनक्रिया सुधारते
जेवण केल्यानंतर छोटा गुळाचा तुकडा आणि बडीशेपचं केल्याने पचन चांगल्या पद्धतीने होतं आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासही मदत मिळते.
२) संधिवात होईल दूर
संधिवाताची समस्या दूर करण्यासाठी गूळ आणि बडीशेप खूप फायदेशीर ठरते. यातील गुणांमुळे संधिवातात होणारी वेदनाही दूर होते.
३) मासिक पाळीतील वेदना कमी होतील
अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटात खूप दुखतं. अशात बडीशेप आणि गुळाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.
कसं कराल सेवन?
तुम्ही जेवण झाल्यावर गूळ आणि बडीशेपचं सेवन असंच करू शकता. तसेच तुम्ही गूळ आणि बडीशेपचं चूर्णही तयार करू शकता. चूर्ण तयार करण्यासाठी बडीशेप, ओवा, वेलची बारीक करून घ्या. नंतर याचं तुम्ही दिवसा जेवणानंतर सेवन करू शकता.