सकाळी रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसूण, बॅड कोलेस्ट्रोलचा होईल नायनाट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 12:22 PM2024-03-21T12:22:00+5:302024-03-21T12:22:33+5:30
जर तुम्ही लसणाचं सेवन गुळासोबत केलं तर शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रोल सहजपणे बाहेर काढू शकता.
Bad cholesterol : लसणाचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांना माहीत आहे. प्राचीन काळापासून लसणाचा एक जडीबुटी म्हणून वापर केला जातो. यात असे अनेक औषधी गुण असतात ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. यात एलिसिन नावाचं तत्व असतं. तसेच यात फॉस्फोरस, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमसारखे खनिज तसेच व्हिटॅमिन सी, के, फोलेट, नियासिन आणि थायमिनसारखे तत्व असतात. अशात जर तुम्ही लसणाचं सेवन गुळासोबत केलं तर शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रोल सहजपणे बाहेर काढू शकता.
आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, व्यायाम न करणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लोकांना शरीरात बॅड कोलेस्ट्रोल वाढण्याची समस्या होत आहे. रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रोल जमा झाल्याने नसा ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाह हळुवार होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकसोबतच इतरही गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशात बॅड कोलेस्ट्रोल नष्ट करण्यासाठी हा उपाय करू शकता.
गूळ आणि लसणाचे फायदे
1) लसूण आणि गूळ सोबत खाल्ला तर तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. लसणामध्ये असलेले तत्व मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रोल कमी होतं. तसेच रक्ताची कमतरताही दूर होते. लसणामुळे हीमोग्लोबिन लेव्हल वाढण्यास मदत मिळते.
2) लसणांमध्ये आढळणारं एलिसिन नावाचं तत्व एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रोलच्या ऑक्सिकरणाला रोखतं. यामुळे कोलेस्ट्रोलची लेव्हल कमी होते आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
3) कच्च्या लसणाचा आहारात समावेश केल्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात. यामुळे आतड्यांना फायदा मिळतो आणि सूजही कमी होते. त्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थही नष्ट होतात.
4) लसणांमध्ये असलेलं झिंक रोग प्रतिकारक क्षमता वाढवतं. हे डोळे आणि कानाच्या इन्फेक्शनला रोखण्यासाठी फायदेशीर असतं.