प्रोटीन आणि कॅल्शिअमचा खजिना आहे ही भाजी, शरीराला मिळेल भरपूर ताकद...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 10:56 AM2024-06-15T10:56:04+5:302024-06-15T10:56:48+5:30

Moringa leaves powder : तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तर अनेकदा खाल्ली असेल पण वरील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली पाहिजे.

Benefits of eating protein and calcium rich moringa leaves powder | प्रोटीन आणि कॅल्शिअमचा खजिना आहे ही भाजी, शरीराला मिळेल भरपूर ताकद...

प्रोटीन आणि कॅल्शिअमचा खजिना आहे ही भाजी, शरीराला मिळेल भरपूर ताकद...

Moringa leaves powder :  अनेकांचं शरीर कमजोर आणि ताकद नसल्यासारखं असतं. अशा लोकांसाठी एक अशी भाजी आहे जी खाऊन तुम्ही दूध आणि अंडीपेक्षाही जास्त ताकद मिळू शकते. इतकंच नाही तर तुमची हाडं मजबूत करण्यासाठी यातून भरपूर कॅल्शिअमही मिळतं. तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तर अनेकदा खाल्ली असेल पण वरील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली पाहिजे. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅल्शिअम असतं.

शक्तीशाली होईल शरीर

शेवग्याच्या पानांचं पावडर बनवून त्याचं सेवनही करू शकता. तसेच सॅलड, अंड्यांवर काटूनही खाऊ शकता. तसेच याचं सूप बनवूनही पिऊ शकता. तसेच हे पावडर ज्यूस, नारळ पाण्यात टाकूनही पिऊ शकता. एक चमचा पावडर, त्यात थोडा लिंबाचा रस टाकूनही सेवन करू शकता. याने किडनी आणि लिव्हर डिटॉक्स होतं.

प्रोटीन - कॅल्शिअमचा खजिना

शाकाहारी लोक प्रोटीन मिळवण्यासाठी दुधाचं सेवन करतात. यूएसडीएनुसार, १०० ग्रॅम शेवग्याच्या पावडरमध्ये ३३ ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन असतं. इतकं प्रोटीन अंड्यामध्येही नसतं. हाडे मजबूत करण्यासाठी शेवग्याच्या पानाचं पावडर फार फायदेशीर ठरतं. कारण यात भरपूर कॅल्शिअम असतं.

डोळे राहतील चांगले

शेवग्याच्या पावडरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं. ज्यामुळे तुमचे डोळ आणि इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. 

ब्लड शुगर कमी करा

डायबिटीसच्या रूग्णांसाठी हे पावडर खूप फायदेशीर ठरू शकतं. कारण या पावडरच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कमी होते. पण याचं जास्तही सेवन करू नये. कारण याने ब्लड ग्लूकोज फार जास्त कमीही होऊ शकतं.

कोलेस्ट्रॉल

नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने हृदयावर दबाव वाढतो. यामुळे हार्ट अटॅकटा धोकाही वाढतो. अशात शेवग्याच्या पानाचं पावडर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.

Web Title: Benefits of eating protein and calcium rich moringa leaves powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.