तुम्हालाही माहीत नसतील लाल भेंडीचे जबरदस्त फायदे; ह्रदयरोग, डायबिटीसवर ठरते रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 04:18 PM2024-05-14T16:18:46+5:302024-05-14T16:25:00+5:30
लाल रंगाची भेंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का? नसेल तर आम्ही सांगतो.
Health Tips : आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरव्या भेंडीच्या भाजीचा समावेश असतो. हिरवी भेंडी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल. पण लाल रंगाच्या भेंडीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नसेल तर आम्ही सांगतो.
हिरव्या रंगाची भेंडी बाजारात सहज उपलब्ध असते. परंतु उत्पादन कमी असल्यामुळे हिरव्या भेंडींच्या तुलनेत लाल भेंडी जरा महाग असते. लाल रंगाच्या भेंडीला 'काशी लालिमा' भेंडी असं देखील म्हणतात. या भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळे डॉक्टर बऱ्याचदा लाल भेंडी खाण्याचा सल्ला देतात.
भेंडी अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. NCBI च्या रिपोर्टनुसार भेंडीच्या भाजीमध्ये कॅल्शिअम, सोडिअम, झिंक,पोटॅशिअम, फॉस्फरस , कॉपर,मॅगनीज, सेलेनियम यांसारखे घटक आढळतात.
गरोदर महिलांसाठी फायदेशीर -
लाल भेंडीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फोलेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ही भेंडी प्रेग्नेंट महिलांसाठी फार फायदेशीर मानली जाते. असं तज्ज्ञांच मत आहे.
डायबिटीसवर रामबाण उपाय-
जे लोक लाल भेंडी जास्त खातात त्यांना टाइप - २ डायबिटीस होण्याचा धोकाही कमी राहतो. कारण लाल भेंडी ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकते.
उच्च रक्तदाब कमी होण्यास उपयुक्त-
ज्या लोकांना ह्रदयरोगाचा धोका असतो त्यांनी आपल्या आहारात लाल भेंडीचा नक्की समावेश करावा. कारण लाल भेंडी खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते.