हिवाळ्यातही बदाम-मनुके भिजवून खावेत का? जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 11:03 AM2024-11-09T11:03:32+5:302024-11-09T11:37:14+5:30
Soaked Almond Raisins In Winter: हिवाळ्यात बदाम आणि मनुके दोन्ही पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अशात जाणून घेऊया की, बदाम आणि मनुक्यांचं सेवन कसं करावं आणि ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत काय आहे.
Soaked Almond Raisins In Winter: थंडीला सुरूवात झाली की, शरीर गरम ठेवण्यासाठी आणि पोषक तत्व मिळवण्यासाठी भरपूर लोक वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सचं सेवन करत असतात. ड्रायफ्रूट्स हे गरम असतात त्यामुळे भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. बरेच लोक बदाम आणि मनुके रात्री पाण्यात भिजवून ठेवतात आणि सकाळी खातात. बदामाचं सेवन केल्याने थंडीपासून बचाव होतो. तसेच मनुके सुद्धा शरीराला उष्णता देण्याचं काम करतात. हिवाळ्यात बदाम आणि मनुके दोन्ही पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अशात जाणून घेऊया की, बदाम आणि मनुक्यांचं सेवन कसं करावं आणि ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत काय आहे.
थंडीत बदाम - मनुके भिजवून खावेत का?
हेल्द एक्सपर्ट्सनुसार, हिवाळा असो उन्हाळा ड्रायफ्रूट्स भिजवून खाणं अधिक फायदेशीर ठरतं. हिवाळ्यातही तुम्ही बदाम आणि मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी सेवन करू शकता. भिजवलेले बदाम आणि मनुके खाल्ल्याने त्यांचे गुण अनेक पटीने वाढतात. भिजवलेले बदाम खाल्ल्याने वजन नियंत्रित राहतं. बदामात व्हिटॅमिन ई आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट भरपूर असतं ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. तसेच बदामात फायबरही भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलं राहतं आणि अनावश्यक खाणं टाळलं जातं. हिवाळ्यात बदाम आणि मनुके खाल्ले तर शरीराला भरपूर एनर्जी सुद्धा मिळते.
कधी करावं यांचं सेवन?
जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम आणि मनुके खात असाल तर याने शरीराची कमजोरी दूर होते. बदाम आणि मनुके खाल्ल्याने शक्ती वाढते. पचन तंत्र मजबूत ठेवण्यासही बदाम आणि मनुके मदत करतात. ज्या लोकांना बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या असते त्यांना रोज भिजवलेले बदाम आणि मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो. या ड्रायफ्रूट्सच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल होण्यासही मदत मिळते.
भिजवलेले बदाम-मनुके खाण्याचे फायदे
बदाम मेंदुसाठी खूप फायदेशीर मानले जातात. बदामात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं जे तुमची स्मरणशक्ती वाढवतं. रोज बदाम खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगलं राहतं. तसेच याने केस आणि त्वचाही चांगली राहते. बदामात आढळणारं व्हिटॅमिन ई एजिंग कमी करून त्वचा चमकदार करतं. तसेच मनुक्यामधील अॅंटी-ऑक्सिडेंट्सने एजिंग आणि त्वचेसंबंधी समस्या दूर होतात.