अळूची भाजी खा... आजारांना दूर पळवा; औषध न घेता ब्लड प्रेशर राहील कंट्रोलमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 01:37 PM2024-06-10T13:37:04+5:302024-06-10T13:40:59+5:30

आपल्या आरोग्यासाठी अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. महाराष्ट्रामध्ये अळूच्या पानांपासून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात.

benefits of eating taro leaves prevent blood pressure also improve digestion know some tips | अळूची भाजी खा... आजारांना दूर पळवा; औषध न घेता ब्लड प्रेशर राहील कंट्रोलमध्ये...

अळूची भाजी खा... आजारांना दूर पळवा; औषध न घेता ब्लड प्रेशर राहील कंट्रोलमध्ये...

Health Tips : आपल्या आरोग्यासाठी अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. महाराष्ट्रामध्ये अळूच्या पानांपासून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. अळू वड्या तसेच अळूच्या पानांची भाजी लोक मोठ्या चवीने खातात. 

अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी-ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून जर सुटका हवी असेल तर या पानांचे सेवन करणे कधीही चांगले असते. असं तज्ज्ञांचं मत आहे. 

अळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय अळू व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी ६, फोलेट तसेच मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मँगनीज या पोषक गुणांनी भरपूर आहे. 

ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात-

आरोग्याच्या विविध व्याधी अळूच्या पानामुळे दूर होतात.अळूची पाने ही हायपरटेनसीव्ह आहेत. त्यामुळे अळूच्या भाजीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात येते, असं तज्ज्ञ सांगतात. 

पचनक्रिया सुधारते-

अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने त्याचे सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहते. 

अशक्तपणा होतो दूर- 

अळूच्या पानांचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये व्हिटॅमिन ए आढळते. त्यामुळे हाडांसंबंधित आजारांपासून मुक्तता मिळते. अळूच्या पानांत पोषकतत्त्व असल्याने ते सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो.

Web Title: benefits of eating taro leaves prevent blood pressure also improve digestion know some tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.