कोलेस्ट्रॉल कमालीचे कमी करतात हे छोटेसे दाणे, आरोग्यवर्धक इतके की अनेक आजारांवर रामबाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2022 07:46 PM2022-08-11T19:46:57+5:302022-08-11T19:47:14+5:30

मेथी ही फक्त कोलेस्ट्रॉलसाठीच नाही तर मधुमेह, वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. जाणून घेऊया मेथीचे इतर फायदे कोणते?

benefits of fenugreek seeds or methi seeds | कोलेस्ट्रॉल कमालीचे कमी करतात हे छोटेसे दाणे, आरोग्यवर्धक इतके की अनेक आजारांवर रामबाण

कोलेस्ट्रॉल कमालीचे कमी करतात हे छोटेसे दाणे, आरोग्यवर्धक इतके की अनेक आजारांवर रामबाण

Next

चवदार भाज्यांपैकी एक असलेली मेथी आपल्या गुणधर्मामुळे देशातच नाही तर परदेशातही चर्चेत आहे. मेथीचा वापर वर्षानुवर्षे औषध म्हणूनही केला जातो. मेथीमध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो, ज्यामुळे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. अनेक संशोधनांमध्ये असेही आढळून आले आहे की, मेथी फक्त केस आणि त्वचेसाठी खास नाही तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. मेथीचा पराठा असो किंवा मेथीची भाजी असो, प्रत्येकाचे आरोग्यासाठी समान फायदे आहेत. मेथी ही फक्त कोलेस्ट्रॉलसाठीच नाही तर मधुमेह, वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. जाणून घेऊया मेथीचे इतर फायदे कोणते (Benefits Of Fenugreek) आहेत.

मासिक पाळीच्या वेदना -
health.com च्या माहितीनुसार, अनेक मुली आणि महिलांना मासिक पाळी दरम्यान खूप वेदना सहन कराव्या लागतात. मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास आणि पेटके कमी करण्यासाठी मेथी खाणे फायदेशीर ठरू शकते. मेथीमुळे पोटदुखीवर आराम तर मिळतोच, पण थकवा, डोकेदुखी, मळमळ, चक्कर यासारख्या समस्याही कमी होतात.

ब्रेस्ट मिल्क वाढण्यास मदत होते -
आईचे दूध वाढवण्यासाठी वर्षानुवर्षे नव मातांना मेथी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. मेथीमध्ये असलेले पोषक घटक आईचे दूध वाढवण्यास मदत करतात. प्रसूतीनंतर, नवीन मातांना मेथीचे लाडू आणि पाणी दिले जाते, जे त्यांच्या अनेक समस्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते -
मेथी पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास मदत करू शकते. हे संप्रेरक कमी असल्याने पुरुषांमध्ये चिडचिड होणे, एकाग्रता न राहणं आणि हाडे कमकुवत होण्याचे प्रकार दिसून येतात. वयाच्या 45 वर्षानंतर पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते. मेथीचे नियमित सेवन केल्यास 10 ते 12 आठवड्यांत ही पातळी 46 टक्क्यांनी वाढू शकते.

कोलेस्टेरॉलची पातळी -
शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मेथीचा वापर केला जाऊ शकतो. मेथीमुळे हृदयाच्या समस्या आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो. त्यासाठी मेथीचा फायदा होतो.

Web Title: benefits of fenugreek seeds or methi seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.