Benefits of Ghee: तूप खाऊन वजन वाढते हा गैरसमज आहे; त्याचे फायदे वाचून चकित व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 07:00 AM2022-07-23T07:00:00+5:302022-07-23T07:00:17+5:30
Benefits of Ghee: स्मरणशक्ती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओज, कफ, मेद कमी करणारे तूप आहारातील उत्तम घटक असून ते सर्व गुणांनी युक्त असते.
जाड व्यक्ती दिसली, की उपहासाने लोक म्हणतात, तूप जरा कमी खात जा. वास्तविक पाहता, जाडेपणाचा आणि तुपाचा दुरान्वये संबंध नाही. अर्थात अतिप्रमाणात सेवन केले, तर कोणतीही गोष्ट वाईटच! परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे. थंडीत तर तूप खाणे 'मस्ट' आहे! एका श्लोकात वर्णन केलेले आहे,
स्मृती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओझ: कफमेदोविवर्धनम
सर्वंस्नेहोत्तमम शीतम मधुरं रसपाकयो:
स्मरणशक्ती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओज, कफ, मेद यांचे वर्धन करणारे तूप सर्व स्नेहात उत्तम असून त्याचा रस आणि विपाक मधुर असल्याने ते सर्व गुणांनी युक्त असते.
१. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.
२. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.
३. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.
४. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.
५. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.
६. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.
७. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.
८. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.
९. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.
१०.तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.
११. आहारात नियमित तुपाचे सेवन केले असता बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
१२. उचकी थांबत नसेल तर अर्धा चमचा गायीचे तूप खावे.
१३. अर्धशिशीचा त्रास असणाऱ्यांनी नाकात गायीच्या तुपाचे २ थेंब टाकावेत.
१४. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटरमुळे शिणलेल्या डोळ्यांचा दिवसभराचा ताण घालवायचा असेल, तर रात्री झोपताना डोळ्यात दोन थेंब तूप टाका.
१५ . तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.
१६. हाता-पायाची जळजळ होत असल्यास गायीच्या तुपाने, पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास जळजळ कमी होण्यास मदत होते.
१७. मूत्रमार्गाशी संबंधित आजार असल्यास जेवणाआधी आणि जेवणानंतर दोन चमचे औषधी तूप खावे.
१८. हे सर्व फायदे आपल्याप्रमाणे एखाद्या गरजवंताला देखील मिळावेत म्हणून शास्त्रात घृत दानाला अर्थात तुपाचे दान करण्याला महत्त्व दिले आहे. त्यानुसार सणासुदीला यथाशक्ती तुपाचे दान करावे अन्यथा साजूक तुपात केलेले पदार्थ दान करावेत.