चक्क कॅन्सरवर रामबाण आहे 'हा' घरगुती मसाला, संशोधनात सांगितलेले फायदे वाचून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 06:16 PM2022-06-23T18:16:33+5:302022-06-23T18:17:02+5:30

कॅन्सरसह अनेक घातक आजारांमध्ये 'आलं' खाल्ल्याने आराम मिळतो, असंही संशोधनात सिद्ध झालं आहे.

benefits of ginger also it is extremely beneficial on cancer says research | चक्क कॅन्सरवर रामबाण आहे 'हा' घरगुती मसाला, संशोधनात सांगितलेले फायदे वाचून अवाक् व्हाल

चक्क कॅन्सरवर रामबाण आहे 'हा' घरगुती मसाला, संशोधनात सांगितलेले फायदे वाचून अवाक् व्हाल

googlenewsNext

भारतीय संस्कृती जगभर विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आयुर्वेद ही त्यातली महत्त्वाची उपचार पद्धती जगभर मान्यही आहे. आयुर्वेदात आपल्या बागेतल्या साध्या वनस्पतींपासून उपचार करण्याचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. सर्दी-पडसं झालं की आपण काढा पितो त्यातही अनेक मसाल्याचे पदार्थ असतात हे तुम्हाला माहीतच असेल. जगातील सर्वांत जास्त पिकवला जाणारा, आणि औषधी पदार्थ म्हणजे `आलं' (Ginger Benifits).

मसाल्यातील हा एक महत्त्वाचा घटक असून, आलं हे बायोअ‍ॅक्टिव युक्त असतं. आरोग्यासाठी आलं खूपच गुणकारी औषध म्हणून वापरलं जातं. अगदी सर्दी, खोकला झाला तरी आल्याचा चहा करून दिला जातो, तुळशीच्या पानांसोबत काढा प्यायल्याने फरक जाणवतो. चहापासून भाज्यांपर्यंत सर्व रेसिपींमध्येही आल्याने चव येते. आल्यामध्ये अनेक पोषकतत्त्व असून ते आरोग्यवर्धक आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपं जातं. आलं हे कच्चं, कोरडं, पावडर, तेल किंवा ज्युस स्वरूपात सेवन केलं जाऊ शकतं. आधुनिक संशोधनातून आल्याचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलंय.

मसाल्याच्या पदार्थांचा वापर 100 हून अधिक आजारांवर उपाय करताना केला जातो. `आलं' हे शरीरिक आणि मानसिक व्याधींवर उपचार करण्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचं पुढे आल आहे. कॅन्सरसह अनेक घातक आजारांमध्ये 'आलं' खाल्ल्याने आराम मिळतो, असंही संशोधनात सिद्ध झालं आहे.

मधुमेहावरही उपयुक्त आलं
'आल्या'तील घटक हे मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी ठरतात. इन्शुलिनचा वापर न करता स्नायुंतील पेशींमध्ये ग्लुकोज वाहून नेण्याच्या प्रक्रियेचा वेग आल्यामुळे वाढतो. अशा प्रकारे, हाय शुगरची पातळी नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते. ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात झालेल्या संशोधनात 'टाईप 2' मधुमेह असलेल्यांसाठी 'आलं' प्रभावी औषध ठरू शकतं असं आढळून आलं आहे.

कॅन्सरवरही प्रभावी ठरतं आलं
मॉडर्न संशोधनानुसार विविध प्रकारच्या कॅन्सरवर आलं हे प्रभावी ठरलं आहे. अमेरिकेतील 'मिशिगन युनिव्हर्सिटी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर'ने केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, आल्याने केवळ ओव्हरीयन कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. केमोथेरपीच्या काळात रुग्णाची प्रतिकारशक्ती क्षीण होते त्यापासूनही आलं बचाव करतं.

या अभ्यासात, संशोधकांनी आलं पावडर आणि पाण्याची पेस्ट ओव्हरीतील कॅन्सरच्या पेशींवर लावली. प्रत्येक चाचणीत असं आढळलं की आल्याचं मिश्रण लावल्यावर कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. स्तनाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलन कॅन्सरच्या उपचारांतही आलं खूप फायदेशीर असल्याचं आढळलं आहे.

प्रवासादरम्यान आलं सोबत ठेवा कारण ते उलट्या आणि मळमळण्याची समस्या कमी करण्यास मदत करते. तुम्ही आलं कँडी, आल्याचा चहा पिऊ शकता. आलं ठेचून गरम पाण्यासोबत प्यायल्यास पोटाची जळजळ नाहीशी होते.

प्रवासादरम्यान आलं सोबत ठेवा कारण ते उलट्या आणि मळमळण्याची समस्या कमी करण्यास मदत करते. तुम्ही आलं कँडी, आल्याचा चहा पिऊ शकता. आलं ठेचून गरम पाण्यासोबत प्यायल्यास पोटाची जळजळ नाहीशी होते.
अनेक वर्षांपासून हृदयविकारांवर उपचार करण्यासाठी आल्याचा वापर केला जात आहे. चिनी वैद्यकीय शास्रात असं म्हटलं जातं की आल्याचे गुणधर्म हृदयाला मजबूत करतात. आल्याच्या तेलाचा वापर हृदयविकाराच्या प्रतिबंध आणि उपचारांमध्ये तिथे होत असे. व्यायामामुळे स्नायूंच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर त्यात आल्याचा वापर केल्यास आराम मिळतो. जर एखाद्याला व्यायामामुळे कोपर दुखत असेल तर दररोज 2 ग्रॅम आल्याचं सेवन केल्यास स्नायू दुखणं कमी होतं. आलं तत्काळ परिणाम दर्शवत नाही, परंतु हळूहळू प्रभाव दिसतो.ऑस्टियोआर्थरायटिस हा एक असा आजार आहे, की ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा येतो. एका संशोधनानुसार, ज्यांना गुडघ्याच्या ऑस्टियोआर्थरायटिसची समस्या होती, त्यांनी आल्याचा अर्क घेतला आणि त्यांच्या वेदनांमध्ये आराम मिळाला. आलं, दालचिनी आणि तिळाच्या तेलाच्या मिश्रणाचा वापर ऑस्टियोआर्थरायटिसच्या वेदना कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

महिलांना मासिक पाळीदरम्यान वेदनांचा सामना करावा लागतो, काहींना कमी तर काहींना जास्त त्रास असतो. मात्र, आल्याच्या पावडरने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. मासिक पाळीदरम्यान दररोज एक ग्रॅम आलं पावडरचं सेवन केल्यास फरक पडतो. खराब कोलेस्ट्रॉरॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो; पण रोज खात असलेल्या अन्नामुळे कोलेस्ट्रॉरॉलची पातळी वाढते. यामुळे त्रासलेल्या लोकांनी दररोज 3 ग्रॅम आल्याची पावडर घेतल्यास आराम मिळतो.

Web Title: benefits of ginger also it is extremely beneficial on cancer says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.