लिंबूपाणी नियमित प्या आणि वजन कमी करा ; उत्तम आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 04:22 PM2024-02-27T16:22:56+5:302024-02-27T16:24:57+5:30

लिंबू पाणी प्या आणि वजन घटवा असे सांगणारे अनेक व्हिडीओ, तसेच रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतात.

benefits of lemon water it helps for weight loss also helpful during summer season | लिंबूपाणी नियमित प्या आणि वजन कमी करा ; उत्तम आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे मत 

लिंबूपाणी नियमित प्या आणि वजन कमी करा ; उत्तम आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांचे मत 

Benefits of lemon water : लिंबू पाणी प्या आणि वजन घटवा असे सांगणारे अनेक व्हिडीओ, तसेच रील्स सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. फक्त लिंबू पाण्यामध्ये वजन कमी करण्याची क्षमता असते  असे नाही. तो एक भाग असू शकतो, सकस आहार आणि जीवनशैलीचा. ज्यामुळे अप्रत्यक्षपणे वजन कमी होण्यास मदत होते, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.

लिंबामध्ये सूक्ष्मजीव विरोधी, कर्करोगविरोधी, अँटी-ऑक्सिडंट, दाहक-विरोधी, कार्डिओ-संरक्षणात्मक असे गुणधर्म आहेत. त्वचा निरोगी आणि तजेलदार होण्यास मदत मिळेत. त्यामुळे रोज सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याने त्वचा संबंधी आजारही बरे होण्यास मदत मिळते.

प्रति नग ६ ते १० रुपये : लिंबाचे  थायलंड, इंडोनेशिया, फिलीपाइन्स आणि उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर उत्त्पन्न घेतले जाते . भारतात केळी आणि आंब्यानंतर घेतले जाणारे हे तिसरे सर्वात मोठे पीक आहे. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक बनले आहे. सध्या लिंबाची किंमत प्रति नग ६ ते १० रुपयांच्या घरात आहे. गरमी वाढत जाईल तशी किरकोळ बाजारात त्याची किंमत देखील वाढेल. - अमित गुप्ता, भाजी विक्रेता

लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, जिरे पूड आणि थोडे मीठ हे मिश्रण खरोखरच एक ताजेतवाने करणारे पेय आहे. लिंबू पाण्यासोबत पुदिना, जिरे यांचे सेवन केल्याने चव वाढते. पुदिन्याची पाने पचनास मदत करतात, तर जिरा पावडरमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहे.  महत्त्वाची बाब म्हणजे त्यात मीठ कमी प्रमाणात घालणे गरजेचे आहे. साखर न घालता लिंबू  पाणी पिणे आरोग्यदायी असते.

हे आहेत फायदे -

१) लिंबू पाणी सकाळी पिणे हायड्रेशनमध्ये मदत करू शकते.

२)  काही व्यक्तींची भूक कमी होऊ शकते. त्याची आंबट चव, संभाव्यतः दिवसभरात कमी कॅलरी वापरण्यास कारणीभूत ठरते. 

३) साखरयुक्त पेये लिंबू पाण्याने बदलल्यास कॅलरी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होते. 

४) लिंबामध्ये मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या व्हिटॅमिन सीमुळे सकाळी लवकर लिंबू पाणी रिकाम्या पोटी घेण्याचा सल्ला दिला जातो.

५) रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आणि त्वचा चांगली होण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन सी हे लोह शोषण्यास उपयोगी ठरते. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. 

Web Title: benefits of lemon water it helps for weight loss also helpful during summer season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.