रोज रात्री मधाने तळपायांची करा मालिश, मिळतात हे एकापेक्षा एक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 02:16 PM2022-08-25T14:16:34+5:302022-08-25T14:16:48+5:30
Benefits Of Applying Honey On Feet Sole: मध त्वचेवर लावण्याचेही अनेक फायदे होतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. जर तुम्ही रोज रात्री झोपताना तळपायांची मधाने मालिश केली तर तुम्हाला अनेक फायदे होतात.
Benefits Of Applying Honey On Feet Sole: मध हे आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर असतं. मधाचा वापर घरगुती उपायांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. कारण मधात अॅंटी इन्फ्लेमेटरी, अॅंटी-ऑक्सीडेंटसारखे गुण असतात. जे अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. तसेच मधाच्या मदतीने तुम्ही घशातील खवखव, खोकला आणि पिंपल्सही दूर करू शकता. मध त्वचेवर लावण्याचेही अनेक फायदे होतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. जर तुम्ही रोज रात्री झोपताना तळपायांची मधाने मालिश केली तर तुम्हाला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ काय होतात फायदे...
त्वचा हायड्रेट राहते - जर तुमची त्वचा रखरखीत आणि निर्जीव झाली असेल तर तळपायांवर तुम्ही मध लावू शकता. तळपायावर मध लावल्याने त्वचा हायड्रेट बनते. याने त्वचेवर ओलावा येते, इतकंच नाही तर त्वचेवरील डागही दूर होतात. चेहरा चमकदार बनतो. यासाठी रोज रात्री झोपताना तळपायांवर मधाने मालिश करा.
ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं - तळपायांवर मधाने मालिश केल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं राहतं. तेच जर तुम्ही तळपायांवर मध लावलं तर याने ब्लड सर्कुलेशन योग्यप्रकारे होण्यास मदत मिळते. सोबतच हात-पायात होणारी वेदनाही दूर होते.
सूज कमी होते - जर तुमच्या पायांवर सूज असेल तर मध लावणं फायदेशीर ठरू शकतं. याचं कारण मधात अॅंटी इंफ्लेमेटरी गुण आढळून येतात. जे सूज कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.
पायांच्या भेगा दूर होतात - तळपायांवर मध लावल्याने पायांना पडलेल्या भेगाही दूर केल्या जाऊ शकतात. मध लावल्याने पायांच्या भेगांमध्ये ओलावा येतो. आणि भेगा भरल्या जातात.