झोपण्याआधी लसणाच्या तेलानं पायांची मालिश केल्यास काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:35 IST2025-02-08T13:35:00+5:302025-02-08T13:35:34+5:30

Benefits of Massaging Garlic Oil on Feet : लसणाच्या तेलानं जर रात्री तळपायांची मालिश केली तर काय होईल, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Benefits of massaging garlic oil on feet at night you should know | झोपण्याआधी लसणाच्या तेलानं पायांची मालिश केल्यास काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्...

झोपण्याआधी लसणाच्या तेलानं पायांची मालिश केल्यास काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्...

Benefits of Massaging Garlic Oil on Feet : लसणामध्ये असे अनेक औषधी गुण आढळतात, जे शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे देतात. वेगवेगळ्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसणानं पचन तंत्र मजबूत राहतं, कोलेस्टेरॉल कमी होतं, सर्दी-खोकला बरा होतो, शरीर डिटॉक्स होतं. त्याचप्रमाणे लसणाचं तेलही फायदेशीर असतं. लसणाच्या तेलानं जर रात्री तळपायांची मालिश केली तर काय होईल, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

खोबऱ्याच्या किंवा मोहरीच्या तेलात लसूण गरम केल्यावर या तेलानं पायांची मालिश केली तर कफ, सूज, श्वास घेण्याची समस्या किंवा फुप्फुसासंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते. लसणाच्या तेलानं मालिश करण्याचा हा उपाय फार पूर्वीपासून केला जातो. अशात याचे काय काय फायदे होतात हे जाणून घेऊ.

लसणाच्या तेलानं पायांची मालिश करण्याचे फायदे

झोपेची समस्या होईल दूर

अनेकांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते. अशात लसणाच्या तेलानं पायांची मालिस केली तर ही समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. या तेलानं मालिश केल्यास मांसपेशींना आराम मिळतो आणि शांत झोप लागते.

फुप्फुसांची समस्या होईल दूर

जर तुमच्या छातीमध्ये कफ जमा झाला असेल आणि फुप्फुसाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर रात्री झोपण्याआधी लसणाच्या तेलानं पायांची मालिश करा. यानं श्वासासंबंधी समस्या दूर होईल.

पायांचं दुखणं होईल दूर

जर पाय कोणत्या कारणानं दुखत असेल तर लसणाच्या तेलानं पायांची मालिश करणं फायदेशीर ठरू शकतं. यानं पाायांचं दुखणं दूर होईल आणि मसल्सना आराम मिळेल.

हृदयासाठी फायदेशीर

लसूण खाणं ज्याप्रमाणे हृदयासाठी फायदेशीर असतं. तसंच लसणाचं तेलही हृदयासाठी फायदेशीर ठरतं. लसणाच्या तेलानं पायांची मालिश केल्यास शरीरात ब्लड सर्कुलेशन चांगल्याप्रकारे होतं. ज्यामुळे नसांमध्ये ब्लॉकेज होत नाहीत.

तळपायांवर लसूण घासण्याचे फायदे

लसणाच्या तेलासोबतच लसूण पायांवर घासणं देखील फायदेशीर ठरतं. या उपायानं पावसाळ्यात पायांमध्ये होणारं फंगस टाळता येतं. हिवाळ्यात पायांवर लसूण घासल्यास उष्णता मिळते आणि तापही कमी होतो. लसणाची कळी ठेवून पायांवर घासली तर ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं.

Web Title: Benefits of massaging garlic oil on feet at night you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.