आरोग्याचा खजिना आहे बाजरीची भाकरी, हिवाळ्यात या समस्यांना ठेवते दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:08 AM2023-01-13T10:08:32+5:302023-01-13T10:09:15+5:30
Bajra Flour For health: तुम्ही जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे...
Bajra Flour For health: हिवाळा हा खाण्या-पिण्यासाठी खूप चांगला मानला जातो. पण यातही काही समस्या होत असतात. हिवाळ्यातही अनेक आजार डोकं वर काढतात. सर्दी-खोकला तर कॉमन आहे. पण सोबतच आपली इम्युनिटी कमी होत असल्याने काही समस्या होतात. तसेच आपलं पचनतंत्रही योग्यपणे काम करू शकत नाही. अशात आम्ही ही समस्या दूर करण्यासाठी एक उपाय सांगणार आहोत. तुम्ही जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे...
1) जर तुम्ही हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. बाजरीच्या भाकरीने पचनक्रियेत खूप सुधारणा होते. त्याशिवाय अपचन, बद्धकोष्टता आणि पोटदुखीसारख्या समस्याही दूर होतात.
2) जर तुम्हाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल तर भाकरी करताना त्यात हिंग, लसूण आणि काळं मीठ टाका. याने भाकरीची टेस्ट वाढेल आणि लसणातील पोषख तत्वांनी इम्यूनिटीही बूस्ट होईल.
3) तुम्हाला माहीत की, बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं. आयरन कमतरता असणाऱ्या लोकांसाठी बाजरीची भाकरी रामबाण उपाय मानला जातो. याने एनीमियाचा धोकाही कमी होतो.
4) हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, बाजरीची भाकरी हृदयाच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. याने नसांमधील ब्लॉकेज कमी केलं जातं आणि त्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होतं. तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी राहतो.