रोज सकाळी चालण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, 'हा' गंभीर आजार तर शिवणारही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 05:28 PM2022-09-02T17:28:14+5:302022-09-02T17:30:17+5:30

मधुमेहासारखे घातक आजार टाळण्यासाठी आणि मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी मॉर्निंग वॉक अतिशय उपयुक्त ठरतो. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक का समाविष्ट करावा हे जाणून घेऊया.

benefits of morning walk | रोज सकाळी चालण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, 'हा' गंभीर आजार तर शिवणारही नाही

रोज सकाळी चालण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, 'हा' गंभीर आजार तर शिवणारही नाही

googlenewsNext

कामाच्या धावपळीमुळे शारीरिक तंदुरुस्तीकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. कारण आजकाल आपण छोट्या छोट्या कामांसाठीही तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. वाढत्या सोयी-सुविधांचा थेट परिणाम शारीरिक तंदुरुस्तीवर होत आहे. त्यामुळे लोक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड देत आहेत. यामुळे अनेक जण गंभीर आजारांना बळी पडत आहेत.

आरोग्य तज्ज्ञ निरोगी राहण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्याची शिफारस करतात. यात मॉर्निंग वॉक हा देखील एक चांगला आणि सोपा पर्याय आहे. सकाळी चालणे अनेक प्रकारे फायदेशीर असते. तसेच त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कष्टाची आवश्यकता नसते. मधुमेहासारखे घातक आजार टाळण्यासाठी आणि मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी मॉर्निंग वॉक अतिशय उपयुक्त ठरतो. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक का समाविष्ट करावा हे जाणून घेऊया.

मधुमेहापासून बचाव : स्टाइल क्रेज डॉट कॉमच्या मते मॉर्निंग वॉक हा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. दररोज 30 मिनिटे मॉर्निंग वॉक केल्याने बीएमआय सुधारू शकतो आणि मेटाबोलिक डिसऑर्डरवर कंट्रोल ठेवण्यासाठी तो प्रभावी सिद्ध होतो.

वजन कमी करण्यात प्रभावी : आजकाल बहुतांश समस्यांमागे लठ्ठपणा हे एक प्रमुख कारण आहे. चालणे हा एक नैसर्गिक व्यायाम आहे आणि त्यामुळे कॅलरी बर्न करण्यास मदत होते. चालण्याने वजन कमी होते आणि कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांचा धोकाही टळतो. त्यामुळे दररोज मॉर्निक वॉक फायदेशीर ठरतो.

नैराश्यापासून होते मुक्ती : सध्याच्या काळात जगातील एक मोठी लोकसंख्या नैराश्यातून जात आहे. परंतु आपल्या जीवनशैलीत लहान बदल करून आपण ही समस्या टाळू शकता. चालण्याने तणाव कमी होतो आणि हृदय निरोगी राहते.

कर्करोग राहतो दूर : मॉर्निंग वॉकमध्ये तुम्हाला ताजी हवा मिळते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. दररोज 30-35 मिनिटे चालल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती कायम राखता येते. दररोज केलेला मॉर्निक वॉक तुम्हाला अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून दूर ठेवण्यासाठी मदत करू शकतो.

Web Title: benefits of morning walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.