इवलंस दिसणार 'हे' फळ पण फायदे फारच मोठे; किडनी, फुफ्फुस आणि त्वचाविकारांवर रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 03:16 PM2022-04-13T15:16:11+5:302022-04-13T15:18:44+5:30

त्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, झिंक, व्हिटॅमिन ए, बी6, सी, ई, के, सोडियम, तांबे इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात. जाणून घेऊया तुती खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे होतात.

benefits of mulberry | इवलंस दिसणार 'हे' फळ पण फायदे फारच मोठे; किडनी, फुफ्फुस आणि त्वचाविकारांवर रामबाण

इवलंस दिसणार 'हे' फळ पण फायदे फारच मोठे; किडनी, फुफ्फुस आणि त्वचाविकारांवर रामबाण

googlenewsNext

तुती हे फळ दिसायला जेवढे सुंदर आहे, तेवढेच आरोग्यदायी आहे. या फळामध्ये अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे शरीराला कित्येक फायदे होतात. उन्हाळ्यात तुती भरपूर खायला हव्यात. चवीला आंबट, गोड तुती उष्माघातापासून आपला बचाव करते. याव्यतिरिक्त रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठीही फायदा होतो. हे फळ त्वचेसोबतच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, झिंक, व्हिटॅमिन ए, बी6, सी, ई, के, सोडियम, तांबे इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात. जाणून घेऊया तुती खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे होतात.

तुतीचे प्रकार
HealthifyMe मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, तुतीचे तीन प्रकार आहेत, पांढरे तुती, लाल तुती आणि काळा तुती. लाल तुतीला अमेरिकन तुती म्हणूनही ओळखले जाते. पांढऱ्या तुतीचे शास्त्रीय नाव मोरस अल्बा आहे, तर लाल तुतीला मोरस रुब्रा म्हणतात. काळ्या तुतीचे वैज्ञानिक नाव मोरस निग्रा आहे. ते मूळतः आशियाई देशांमध्ये, विशेषतः दक्षिण-पश्चिम आशियामध्ये आढळतात.

तुतीचे आरोग्य फायदे

मूत्रपिंडासाठी तुतीचे फायदे
किडनी शरीरातील खराब घटक आणि विषारी द्रव्य काढून टाकण्याचे काम करते. एका अभ्यासानुसार, मधुमेहामुळे किडनी खराब झालेल्या लोकांसाठी तुतीचा अर्क किंवा रस फायदेशीर ठरू शकतो. तुतीचे अर्क इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते, शरीरातील इंफ्लेमेशन उपचार करते.

केसांसाठी तुतीचे फायदे
मेलेनिन हे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे, ज्यामुळे केसांना चांगला रंग प्राप्त होत असतो. जेव्हा मेलेनिनची शरीरात निर्मिती कमी होते, तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. संशोधनानुसार, तुती मेलेनिन तयार करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ती केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे. अवेळी केस पांढरे होऊ नयेत, असे वाटत असेल तर तुती खा. तुतीचा रस प्यायल्याने केसांची वाढही होते. तुम्ही तुतीचा रस थेट केसांना लावू शकता.

त्वचेसाठी तुतीचे फायदे
तुतीचा अर्क त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. पिगमेंटेशनचा त्रास कमी होतो. त्वचा टोन राहते, गडद डाग कमी होतात. तुतीमध्ये असलेले घटक सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करतात. तसेच, अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्वविरोधी म्हणून काम करतात. तुतीमधील व्हिटॅमिन ए, सी, ई सुरकुत्याची समस्या कमी करण्यास मदत करते.

फुफ्फुसासाठी तुतीचे फायदे
तुम्हाला फुफ्फुसाचा संसर्ग असेल तर यामध्येही तुती खाणे फायदेशीर ठरते. तुतीच्या झाडाच्या मुळाच्या सालात देखील अँटीव्हायरल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो, त्यामुळे तुती फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करते.

Web Title: benefits of mulberry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.