Summer Health tips: उन्हाळ्यात 'हे' फळ म्हणजे हृदय, किडनीसाठी फायदेशीर, आजपासूनच सेवन करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:36 PM2022-04-07T18:36:52+5:302022-04-08T13:39:15+5:30

शरीराला गंभीर आजारांपासून वाचवण्यास हे फळ उपयोगी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. खरबूज खाण्याचे फायदे जाणून (Muskmelon Benefits in summer ) घेऊयात.

benefits of muskmelon in summer | Summer Health tips: उन्हाळ्यात 'हे' फळ म्हणजे हृदय, किडनीसाठी फायदेशीर, आजपासूनच सेवन करा

Summer Health tips: उन्हाळ्यात 'हे' फळ म्हणजे हृदय, किडनीसाठी फायदेशीर, आजपासूनच सेवन करा

googlenewsNext

उन्हाळ्यात (Summer) फळांचा राजा आंब्याची बहुतेक लोक आतुरतेने वाट पाहत असले तरी आरोग्याच्या फायद्यांवर (Health Benefits) नजर टाकली तर खरबूज (Muskmelon) सुद्धा या ऋतूत सुपरफूडपेक्षा कमी नाही. खरबूज उन्हाळ्यात मिळणारे हंगामी फळ आहे, जे प्रत्येकाला खायला आवडते. हे फळ ९७ टक्के पाण्याने भरलेले असते, यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. हेल्थलाइननुसार, खरबूजामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आढळतात. शरीराला गंभीर आजारांपासून वाचवण्यास हे फळ उपयोगी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. खरबूज खाण्याचे फायदे जाणून (Muskmelon Benefits in summer ) घेऊयात.

प्रतिकारशक्ती वाढते
खरबूजामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. यामुळे आपण संसर्ग आणि रोगापासून वाचू शकतो.

वजन कमी
खरबूजामध्ये पाणी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतं. यामुळं शरीर हायड्रेट राहतं आणि आतडे स्वच्छ ठेवण्याचे काम आपोआप होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर
खरबूजात आढळणारा एडेनोसिन नावाचा घटक शरीरातील रक्त पातळ करतो, त्यामुळे रक्त घट्ट होत नाही आणि हृदयविकाराचा धोका टळतो.

बद्धकोष्ठता
खरबूजात पाणी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते.

डोळ्यांसाठी फायदेशीर
यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन आढळतात. हे दोन्ही घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

किडनीसाठी फायदेशीर
खरबूजात पाणी मुबलक प्रमाणात आढळते आणि ऑक्सिजन मिळतो त्यामुळे किडनीमध्ये मुतखड्याचा त्रास होत नाही आणि ते सहज फ्लश होत राहतं.

मधुमेहामध्ये खरबूज खा
खरबूज चवीला गोड असला तरी त्यात साखरेचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेले लोकही ते खाऊ शकतात.

Web Title: benefits of muskmelon in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.