ओट्स खाल्ल्यामुळे फफ्त वजन कमी होत नाही! इतर फायदे वाचून व्हाल चकित, रोजच सेवन कराल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 05:10 PM2022-07-05T17:10:52+5:302022-07-05T17:16:23+5:30
ओट्सच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे ओट्स वजन कमी (Weight Loss) करण्यासदेखील मदत करतात.
लोक नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थ खाणे पसंत करतात. यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे. ओट्स (Oats Health Benefits) आरोग्यासाठी खूप लाभदायक असते, ज्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. ओट्स पोटासाठीदेखील चांगले असतात, कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ओट्सच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे ओट्स वजन कमी (Weight Loss) करण्यासदेखील मदत करतात.
ओट्समध्ये फायबर, एनर्जी, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, झिंक, पोटॅशियम, नियासिन, व्हिटॅमिन ए, बी6, बी12, व्हिटॅमिन डी इत्यादी अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात.
ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचा शक्तिशाली फायबर असतो जो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. बीटा-ग्लुकन हा ओट्समधील विरघळणाऱ्या फायबरचा मुख्य घटक आहे आणि तो चांगल्या कोलेस्टेरॉलच्या (Good Cholesterol) पातळीला प्रभावित न करता खराब कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) कमी करतो. ओट्समधील अँटिऑक्सिडंट्स LDL ऑक्सिडेशन रोखण्यासाठी व्हिटॅमिन सी सोबत काम करतात. ओट्समुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्याच्यातील उच्च फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Control Blood Sugar) करण्यास मदत करते. तसेच ओट्समध्ये भरपूर फायबर असल्याने ते हळूहळू पचते. जे अन्न लवकर पचते ते रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढवू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण करणे कठीण होते. या तुलनेत ओट्स हळूहळू पचतात.
ओट्समध्ये दाहक-विरोधी गुणधर्म (Oats Skin Benefits) आहेत जे त्वचेतून तेल आणि बॅक्टेरिया शोषून घेतात आणि काढून टाकतात. ते त्वचेच्या मृत पेशींना बाहेर काढण्यास मदत करते, यामुळे त्वचेवरील मुरूम आणि पिंपल्स कमी होते. ओट्स एमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिन बीमध्ये समृद्ध आहे. ते रक्ताभिसरण वाढवून पिगमेंटेशनशी लढा देण्यास मदत करते आणि काळे डाग कमी करतात.
\ओट्स हे अँटिऑक्सिडंटदेखील आहे. ते सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. ओट्स सॅपोनिनने समृद्ध आहे, जे तीव्र एक्सफोलिएटिंग गुणधर्मां असलेले एक नैसर्गिक क्लीन्सर आहे. हे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. त्वचेवरील छिद्र मोकळी करते आणि ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करते. संवेदनशील त्वचा आणि लहान मुलांच्या त्वचेसाठी चांगले आहे.