अपचन होतंय? अन् डायबिटीसही आहे? मग 'या' आंबट फळांच्या पानांचा चहा ठरेल वरदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 06:03 PM2022-06-12T18:03:12+5:302022-06-12T18:15:06+5:30

चिंचेचा पानांचा चहा खूप आरोग्यदायी असतो. चिंचेचा चहा (Tamarind Leaf Tea) प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि या चहाच्या साह्याने तुम्ही वजन देखील कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला त्याचे काय फायदे सांगणार आहोत.

benefits of tamarind leaves tea helpful for weight loss diabetes | अपचन होतंय? अन् डायबिटीसही आहे? मग 'या' आंबट फळांच्या पानांचा चहा ठरेल वरदान

अपचन होतंय? अन् डायबिटीसही आहे? मग 'या' आंबट फळांच्या पानांचा चहा ठरेल वरदान

Next

चिंचेचं (Tamarind) साधं नाव जरी काढलं तरी तोंडाल पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. चिंच चवीला खूप आंबट असली तरी ती आरोग्यासाठी (Tamarind For Health) खूप फायदेशीर असते. चिंचेची पाने देखील आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त (Tamarind Leaf Benefits) असतात. चिंचेचा पानांचा चहा खूप आरोग्यदायी असतो. चिंचेचा चहा (Tamarind Leaf Tea) प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि या चहाच्या साह्याने तुम्ही वजन देखील कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला त्याचे काय फायदे सांगणार आहोत.

चिंचेचा चहा पिण्याचे फायदे?
1) अपचनाच्या (Indigestion) समस्येचा सामना करत असलेल्या लोकांसाठी देखील चिंचेचा चहा खूप उपयुक्त ठरू शकतो. चिंचेच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात जे शरीरातील पाचक रसाला उत्तेजित करण्याचे काम करतात. त्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. चिंचेच्या चहाचे सेवन केल्याने पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

2) लठ्ठपणाचा (Obesity) सामना करत असलेल्या लोकांसाठी चिंचेचा चहा वरदान ठरू शकतो. अनियमित जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि धावण्यासारखे मेहनतेचे पर्याय अवलंबतात. परंतु त्यासोबत तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले तर वजन वेगाने कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. अशा स्थितीतत तुमच्यासाठी चिंचेचा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांनी चिंचेचा चहा नियमित प्यावा

3) शुगरचा त्रास (Sugar) असलेल्या लोकांसाठी चिंचेचा चहा अतिशय उपयुक्त ठरू शकतो. चिंचेच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स हे घटक आढळतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच चिंचेच्या अर्कामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे तुम्हाला मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

4) चिंचेच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol level) नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. शरीरात दोन प्रकारचे गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. यातील बॅड कोलेस्ट्रॉलची शरीरातील पातळी वाढली तर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशावेळी चिंचेच्या पानांचा चहा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

Web Title: benefits of tamarind leaves tea helpful for weight loss diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.