Benefits Of Tea : तुम्हाला माहीत आहेत का चहा घेण्याचे फायदे? कमी होऊ शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 11:24 PM2022-04-29T23:24:24+5:302022-04-29T23:25:17+5:30
चहाच्या फायद्यांसंदर्भात एका अभ्यासात मोठे खुलासे करण्यात आले आहेत...
चहा हे केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये पसंत केले जाणारे पेय आहे. भारताशिवाय चीन आणि जपानमध्येही मोठ्या प्रमाणावर चहा घेतला जातो. पण चहा घेणाऱ्या अनेकांना त्याचे आरोग्य विषयक फायदे (Health Benefits) माहीत नसतात. चहाच्या फायद्यांसंदर्भात एका अभ्यासात मोठे खुलासे करण्यात आले आहेत. (Some Health Benefits Of Tea)
चहामध्ये कोण-कोणते घटक आढळतात? -
चहात पॉलीफेनोल्स (Polyphenols), कॅटेचिन (Catechin), थियाफ्लेविन्स (Theaflavins) आणि थेरुबिगिन्स (Thearubigins) हे घटक आढळून येतात. यांत इंफ्लेमेटरी, कॅन्सरविरोधी आणि कार्डियोप्रोटेक्टिव्ह गुण असतात. नव्या रिसर्चनुसार, चहा कॅन्सर आणि हृदयाच्या समस्यांचा सामना करण्यात प्रभावी सिद्ध होऊ शकतो.
कमी होऊ शकतो या गंभीर आजारांचा धोका -
चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारे अँटीऑक्सिडेंट्स (Antioxidants) रक्तातील हानिकारक मॉलिक्यूल्स बाहेर काढण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते. यूएसटी काउंसिलच्या मते, काळा, हिरवा आणि हर्बल चहामध्ये अधिक प्रमाणात आढळणारा फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) आपली इम्युनिटी वाढवून बॅक्टेरिया आणि व्हायरल इंफेक्शनचा सामना करण्यात मदत करतो. याशिवाय, चहा डिमेंशिया (Dementia) चा धोका आणि स्ट्रेस कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.
काय सांगतो रिसर्च? -
रिसर्चनुसार, रोजचा 1 कप चहा स्ट्रोक अथवा हार्ट प्रॉब्लेमचा (Heart Problem) धोका 4 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. याशिवाय, तरुणांमधील मृत्यूचा धोकाही 1.5 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. मात्र, याच बरोबर एका दुसऱ्या अहवालात, अधिक गरम चहा प्यायल्याने इसोफेगल कॅन्सरचा (Esophageal Cancer) धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.