रोज केवळ ११ मिनिटे पायी चाला अन् हृदय निरोगी ठेवा, रिसर्चमधून महत्वाचा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 03:41 PM2024-09-26T15:41:24+5:302024-09-26T15:42:32+5:30

Walking Benefits : वजन कमी करण्यासाठी किंवा हृदय निरोगी ठेवण्यासाठी किती पायी चालावं यावर वेगवेगळे रिसर्च नेहमीच समोर येत असतात. अशात आता आणखी एक रिसर्च समोर आला आहे. 

Benefits of walking 11 minutes daily you will shock | रोज केवळ ११ मिनिटे पायी चाला अन् हृदय निरोगी ठेवा, रिसर्चमधून महत्वाचा खुलासा!

रोज केवळ ११ मिनिटे पायी चाला अन् हृदय निरोगी ठेवा, रिसर्चमधून महत्वाचा खुलासा!

Walking Benefits : वॉक करणं म्हणजे पायी चालणं ही फीट राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी सगळ्यात चांगली एक्सरसाईज मानली जाते. पायी चालणं ही सगळ्यात सोपी आणि फायदेशीर एक्सरसाईज आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा हृदय निरोगी ठेवण्यासाठी किती पायी चालावं यावर वेगवेगळे रिसर्च नेहमीच समोर येत असतात. अशात आता आणखी एक रिसर्च समोर आला आहे. 

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित लेखानुसार, संशोधकांनी सांगितलं की, रोज केवळ ११ मिनिटे म्हणजे आठवड्यातून ७५ मिनिटे ब्रिस्क वॉक केल्याने म्हणजे वेगाने पायी चालल्याने हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो. हा रिसर्च जवळपास ३० मिलियन लोकांवर करण्यात आला होता. 

काय सांगतो रिसर्च?

रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, रोज केवळ ११ मिनिटे वॉक करूनही तुम्ही कार्डिओवस्कुलर डिजीजचा धोका १७ टक्क्यांनी कमी होतो आणि कॅन्सरचा धोका ७ टक्क्यांनी कमी होतो. अभ्यासकांना आढळलं की, याने ६ पैकी एक अकाली मृत्यूपासूनही बचाव केला जाऊ शकतो. तसेच या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं की, आपल्या छोट्या छोट्या अनहेल्दी सवयी सुधारून आपण आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करू शकतो. अशात जाणून घेऊ पायी चालण्याचे काही फायदे...

वॉक करण्याचे फायदे

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, रोज वॉक केल्याने स्ट्रेस लेव्हल कमी होतो, ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं, स्ट्रोकचा धोका कमी होतो, कार्डिओवस्कुलर हेल्थही चांगलं राहतं, झोप चांगली येते, हाडे मजबूत राहतात, लठ्ठपणा दूर होतो आणि डायबिटीसही कंट्रोल राहतो. 

- पायी चालल्याने कलात्मक विचार वाढतात आणि तुम्हाला अनेक अवघड समस्यांमधून बाहेर पडण्यासही मदत मिळते.

- रोज किमान ११ मिनिटे वॉक केल्याने तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते.

- जर तुम्ही रोज काही तास एक्सरसाईज करू शकत नसाल तर तुम्ही रोज किमान ११ मिनिटे पायी चालू शकता. NHS UK नुसार, रोज ११ मिनिटे वेगाने पायी चालण्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

- रोज ११ मिनिटे पायी चालणं तुमच्या गुडघ्यांसाठीही फायदेशीर ठरतं. सकाळी नियमितपणे पायी चालल्याने तुमचं एखादं जुनं दुखणंही दूर होतं आणि जॉईंट्सच्या समस्या दूर करण्यासही मदत मिळते. 

Web Title: Benefits of walking 11 minutes daily you will shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.