झोपण्याआधी 30 मिनिटे वॉक केल्याने काय होतं? वाचाल तर रोज लावाल 'ही' सवय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 05:20 PM2024-09-13T17:20:02+5:302024-09-13T17:20:31+5:30

Before Sleeping Walk : झोपण्याआधी पायी चालण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल.

Benefits of walking 30 minuts after dinner know how to walk at night | झोपण्याआधी 30 मिनिटे वॉक केल्याने काय होतं? वाचाल तर रोज लावाल 'ही' सवय...

झोपण्याआधी 30 मिनिटे वॉक केल्याने काय होतं? वाचाल तर रोज लावाल 'ही' सवय...

Before Sleeping Walk : एक्सरसाईज करण्याची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पायी चालणं मानली जाते. डॉक्टर नेहमीच सकाळी, सायंकाळी जेवण झाल्यावर पायी चालण्याचा सल्ला देतात. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात जे अनेकांना माहीत नसतात. अशात रोजच्या रूटीनमध्ये रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने बरेच फायदे होतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

झोपण्याआधी पायी चालण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल. "क्यूरियस 2023" मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, चालल्याने आणि हलकी एक्सरसाईज केल्याने चांगली झोप येण्यास मदत मिळते. पायी चालल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि आपल्याला आराम मिळतो. 

वजन कमी करण्यास मदत

'न्यूट्रिएंट्स 2022' मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने मेटाबॉलिज्म वाढतं आणि झोपेदरम्यानही कॅलरी बर्न होतात. झोपण्याआधी पायी चालल्याने वजन कमी करण्यास किंवा कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. हार्डकोर फिजिकल अॅक्टिविटीने अधिक कॅलरी बर्न होतात. रात्री पुन्हा पुन्हा पायी चालल्याने कॅलरी मॅनेजमेंटमध्येही सुधारणा होते. 

मानसिक आरोग्य सुधारतं

सांयकाळी चालणं आपल्या मानसिक आणि शरीरिक आरोग्यासाठी चांगलं असतं. एका रिसर्चनुसार, पायी चालल्याने तणाव आणि चिंतेची लक्षणं कमी केली जाऊ शकतात. पायी चालल्याने आपले नकारात्मक विचार दूर होतात आणि आपल्या मेंदुला दिवसभरातील घटना पचवण्यास मदत मिळते.

अन्न पचवण्यास मदत

अनेक लोकांना रात्री जेवण केल्यावर अपचन किंवा ब्लोटिंगची समस्या होते. अशात त्यांना झोपही चांगली येत नाही. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका स्टडीनुसार, जेवण केल्यावर थोडा वेळ चालल्याने अन्न चांगलं पचन होण्यास मदत मिळते. असं केल्याने शरीरात जास्त अॅसिड होत नाही आणि गॅसही होत नाही. 

रात्री चालण्याची पद्धत

- रात्री जेवण झाल्यावर चालताना स्पीड हळूवार आणि आरामदायक ठेवा.
- एखादी शांततापूर्ण जागेची निवड करा.
- चालल्याने आरामासाठी स्ट्रेचिंग करा. 

Web Title: Benefits of walking 30 minuts after dinner know how to walk at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.