खोबरेल तेलाच्या मदतीने दातांची अशी घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 10:28 AM2018-07-23T10:28:14+5:302018-07-23T10:28:22+5:30
खोबऱ्यांच्या तेलांचे केसांना होणारे फायदे तुम्हाला माहीत आहेत. पण खोबऱ्याच्या तेलाने दातांचीही काळजी घेतली जाऊ शकते.
दातांची काळजी घेतली नाही तर तुम्हाला चारचौघांमध्ये हसण्याचीही लाज वाटेल. त्यामुळे अनेकजण दातांची काळजी घेण्यासाठी हजारों रूपये खर्च करतात. पण काही लोक दातांच्या आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण दातांची काळजी घेण्यासाठी केवळ डॉक्टरकडेच गेलं पाहिजे किंवा बाजारातून महागडे प्रॉडक्टच घेतले पाहिजे असं काही नाही. खोबऱ्यांच्या तेलांचे केसांना होणारे फायदे तुम्हाला माहीत आहेत. पण खोबऱ्याच्या तेलाने दातांचीही काळजी घेतली जाऊ शकते.
एका अभ्यासानुसार, जवळपास २० मिनिटे ऑईल पुलिंग म्हणजेच खोबऱ्याच्या तेलाचा गुरळा केला तर दाता निरोगी राहतात आणि तोंडालाही याचा फायदा होतो. तेलाने गुरळा करणे ही एक जुनी पद्धत आहे. ज्या लोकांना दातांची आणि हिरड्यांची समस्या असते त्यांना तेलाने गुरळा करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासोबतच सर्दी, खोकला, घशाला होणारा त्रास या समस्या याने दूर होतात.
१) दातांची आणि हिरड्यांची स्वच्छता
दातांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला ब्रश करणे आणि गुरळ करण्याची गरज असते. खोबऱ्याच्या तेलाने २० मिनिटे गुरळा केल्यास दात स्वच्छ होतात.
२) खराब तेलाने होतं नुकसान
खराब तेलाने गुरळा केल्यास तुमच्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या तेलाचा वापर करा. हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमधील एका अभ्यासानुसार, प्रत्येच आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये मर्करी, लीड आणि आर्येनिक असतं, जे हानिकारक असतात.
३) केवळ दातांची स्वच्छता होते
खोबऱ्याच्या तेलाने गुरळा केल्यास दातांमधील घाण निघते. अनेकांना असं वाटतं की, तेलाचा गुरळा केल्याने दात चमकदार होतात. पण यात काही तथ्य नाही.
४) जबड्याचं दुखणं होतं कमी
अनेकजण असं मानतात की, तेलाने गुरळा केल्यास जबड्यांच दुखणं कमी होतं. तेलाच्या गुरळ्याने थोडावेळ आराम नक्कीन मिळेल, पण नेहमीसाठी त्रास दूर होणार नाही.