गणेशोत्सवात खा कृष्णा फळ, 'या' रोगांवर जालीम उपाय; आजार आसपास फिरकणारही नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 01:42 PM2021-09-10T13:42:59+5:302021-09-10T13:50:07+5:30
कृष्णा फळ जांभळ्या रंगापासून पिवळ्या आणि सोनेरी रंगात बदलते. हे चवीला गोड-आंबट असते. कार्ब्स, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, ए, डी, के, ई, लोह, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक पोषक तत्वे या फळामध्ये आढळतात. ही पोषकतत्वे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
आपण कधी पॅशन फ्रुट (passion fruit) बद्दल ऐकले आहे का? हे फळ ‘कृष्णा फळ’ म्हणूनही ओळखले जाते. कृष्णा फळ हे ब्राझील (Brazil) मधील फळ आहे, परंतु आज अनेक देशांमध्ये त्याची लागवड केली जात आहे. भारतात नागालँड, केरळ, कर्नाटक, मिझोराम आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये याचे भरपूर उत्पादन घेतले जाते. कृष्णा फळ जांभळ्या रंगापासून पिवळ्या आणि सोनेरी रंगात बदलते. हे चवीला गोड-आंबट असते. कार्ब्स, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, ए, डी, के, ई, लोह, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक पोषक तत्वे या फळामध्ये आढळतात. ही पोषकतत्वे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
डायबिटीस
कृष्णा फळाचे सेवनामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो.डायबिटीस असणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर मानले जाते. या फळामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हे इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. चसेच कृष्णा फळं खाल्ल्याने डायबिटीसच्या रुग्णांना दीर्घकाळ भूक लागत नाही आणि त्यांचे वजन वाढत नाही.
हृदयरोग
कृष्णा फळ हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात पोटॅशियम, तसेच इलेक्ट्रोलाइट असते, जे हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते. ते खाल्ल्याने हृदय आपले कार्य अधिक चांगले करते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
ऑस्टियोपोरोसिस
हाडांची घनता वाढवण्यास गरजेचे असणारे मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक या फळात आढळतात. त्याच्या सेवनामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
दमा
असे म्हटले जाते की जर याच्या सालीचा अर्क वापरला गेला तर दमा आणि श्वासोच्छवासाच्या समस्येमध्ये बराच आराम मिळतो. तसेच फळ देखील रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. परंतु कृष्णा फळ थंड असते, म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करणे योग्य.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
कृष्णा फळांमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-क्रिप्टोक्सॅन्थिन आणि अल्फा-कॅरोटीन असते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी कार्य करते. मजबूत प्रतिकारशक्ती असणे शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. तसेच हे फळ लोहयुक्त असल्याने, शरीरात रक्ताचा कमतरता निर्माण होत नाही. याच्या नियमित सेवनाने अॅनिमियाचा त्रास होत नाही.